Vegetables Rates News : सध्या पितृपंधरवड्यामुळे विविध प्रकारच्या भाज्यांना मागणी (Vegetables Demand) वाढली आहे. त्यामुळं पुण्यातील बाजारात विविध प्रकारच्या भाज्यांच्या दरात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. भाज्यांचे दर आणखी 15 दिवस तेजीत राहणार असून, नवरात्रौत्सवात भाज्यांच्या दरात घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, सध्या वाढत जाणाऱ्या भाज्यांच्या दरामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 


पितृपंधरवडा सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. मागणीच्या तुलनेत भाज्यांची आवक कमी होत असल्याचं चित्र बाजारात पाहायला मिळत आहे. त्यामुळं सध्या भाज्यांचे दर तेजीत आहेत. येत्या काही दिवसात भाज्यांच्या मागणीत वाढ होणार आहे. पितृपंधरवड्यात गवार, भेंडी, कारली, देठ, आले, अळू, काकडी या भाज्यांच्या मागणीत वाढ होत आहे. जाणून घेऊयात कोणत्या भाजीला बाजारात किती दर मिळत आहे, याबाबतची माहिती. 


किणत्या भाजीला किलोला किती दर?


गवार - 120 रुपये किलो


भेंडी - 80 रुपये किलो


कारले - 80 रुपये किलो


काकडी - 80 रुपये


देठ- 20 रुपये (एक नग)


अळूची पाने- 20 रुपये जुडी


भाज्यांना आणखी मागणी वाढणार


पुणे मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात पितृपंधरवड्यात लागणार्‍या भाज्यांची आवक पुणे जिल्हा आणि विभागातून होत आहे. पावसाने उघडीप दिली असल्याने विक्रीसाठी बाजारात दाखल होत असलेल्या भाज्यांचा दर्जा चांगला आहे. त्यामुळेही या भाज्यांना दर मिळत आहे. पितृपंधरवड्याचा कालावधी जसाजसा जवळ येत राहील, तशी भाज्यांनाही आणखी मागणी वाढेल. पितृ-पंधरवाड्यात घरातील दिवंगत वाडवडिलांच्या नावे नैवेद्य दाखवून जेवण घालण्याची परंपरा आहे. ही परंपरा मोठ्या प्रमाणात पाळली जाते. त्यामुळे पितृपंधरवड्यात भाज्यांना मागणी वाढली आहे. 


फळांच्याही मागणीत वाढ


दरम्यान, बाजारात फळांनाही मागणी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. पेरू, केळी आणि डाळिंबाला मागणी वाढली आहे. त्यामुळं घाऊक आणि किरकोळ बाजारात या तीनही फळांच्या दरात वाढ झाली आहे. पेरु आणि केळीच्या तुलनेत डाळिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात डाळिंबाचा प्रतिकिलोचा दर 100 ते 300 रुपये आहे. केळी 40 ते 50 रुपये डझन, तर पेरूचा किलोचा दर 20 ते 50 रुपये  आहे. दरम्यान, सध्या वाढत जाणाऱ्या भाज्यांच्या दरामुळं आणि फळांच्या दरामुळं शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. पुढचे काही दिवस आमखी दर वाढण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा