पुणे : पुण्यात सार्वजनिक गणेशात्सवाचा पाया घालणाऱ्या भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणेकरांना स्वातंत्र्यापूर्वीचा काळ अनुभवता येणार आहे. भाऊसाहेबांच्या वाड्यातील तळघरात सापडलेला ऐतिहासिक ठेवा पुणेकरांना पाहता येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्याची मूक साक्षीदार असलेली, क्रांतिकारकांना सदैव साथ देणारी, ताकद देणारी शस्त्रास्त्रं हाच तो बहुमूल्य खजिना. सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया घालणाऱ्या पुण्यातील भाऊसाहेब रंगारी यांच्या विंचूरकर वाड्यात हा ऐतिहासिक खजिना सापडला आहे. यंदा गणेशोत्सवाच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त हा ठेवा पुणेकरांना पाहता येणार आहे.
क्रांतिकारकांना सहाय्य करणाऱ्या भाऊसाहेबांच्या या वाड्यात अनेक छुप्या खोल्या, तळघर आहे. या खोल्यांचं लवकरच एक संग्रहालय बनवण्यात येईल. 1892 पासून या मंडळाची एकच मूर्ती कायम आहे. लाकूड आणि भुसा वापरुन बनवलेली ही मूर्ती बनवण्यात आली आहे. भाऊंप्रमाणे ही मूर्तीही क्रांतिकारी आहे.
देशात शिरलेल्या ब्रिटीशरुपी राक्षसाला संपवण्याचा विडा घेतलेल्या क्रांतिकारकांचं ते प्रतीक आहे. यंदा मंडळाच्या 125 व्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा त्यातील क्रांतिकारकांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत होणार आहे.