मुंबई : नेहमीच चर्चेत असणाऱ्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज पाण्याचा प्रवाह पाहायला मिळाला. खालापूर टोलनाका ते पालीफाटा दरम्यान पाण्याचा प्रवाह आल्याने वाहनचालकही आश्चर्यचकित झाले.
सिमेंटच्या रस्त्यावर भेगा पडल्यानं आणि खड्डे झाल्यानं या खड्ड्यातलं पाणी उताराच्या दिशेनं वाहू लागलं. अचानक रस्त्यावर पाणी आल्याचं पाहून प्रवासीही चकित झाले. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्याच्या कामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
सध्या रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबीकडून डांबर टाकून रस्त्याची डागडुजी करण्यात आली आहे. मुंबई पुणे दृतगती मार्गावर कायमच वर्दळ असते, त्यामुळे या हलगर्जीकडे गांभीर्याने पाहिले जाण्याची शक्यता आहे.