Bhagat Singh Koshyari Controversy: बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्रपतींनी तात्काळ राजीनामा घेण्याची लेखी मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. राज्यातील जनतेची जाणूनबुजून नेहमी भावना दुखवणारे राज्यपाल महाराष्ट्रला लाभले आहेत. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राजीनाम्याची मागणी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे.


यापुर्वीही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांवर बेताल वक्तव्य करणा-या राज्यपालांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे नितीन यादव यांनी केली होती. त्यावेळी कारवाई केली नाही पंरतु आता तरी राष्ट्रपतीनी तात्काळ राज्यपालांचा राजीनामा घेऊन राज्यातील जनतेच्या भावनेचा आदर करतील अशी भावना नितीन यादव यांनी व्यक्त केली आहे.


एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी यांनी ‘गुजरात, राजस्थानचे लोक महाराष्ट्रातून निघून गेले तर महाराष्ट्राकडे पैसा राहणार नाही,’ असे अतिशय संतापजनक आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना दुखावणारे विधान केले आहे. त्यावर आता राज्यभरातून संतापाची लाट दिसून येत आहे. प्रत्येक शहरात त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. पुण्यात शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे नेतेदेखील या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरले होते.


राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडे दाखवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पुण्यातील शिसैनिकांनी आंदोलन केलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत राज्यपालांविरोधात हल्लाबोल केला आहे. कोशारी मत करो होशारी असं लिहिलेले फलक हाती घेत शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. पुण्यातील राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा आक्रमक झाले आहेत. राज्यपाल हटाओ महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणा देत  आंदोलन करत आहेत. राज्यपाल हे राज्यपाल नसून भाजपपाल आहेत, असं विधानदेखील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आलं आहे. 


गुजराती गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही- प्रकाश आंबेडकर


मुंबईतील (Mumbai) मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमधे आहे.  हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वक्तव्यावर केली आहे.