Baramati News : अॅग्रीकल्चर डेव्हलपेंट ट्रस्टच्या (Agricultural Development Trust) कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आज (3 जानेवारी) होणार आहे. माय्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉक्टर रणवीर चंद्रा आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे आर्टिफिशयल इंटेलिजनस विभगाचे डॉ अजित जावकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सकाळी दहा वाजता चंद्रा आणि जावकर हे बारामतीमधील विविध संस्थांना भेटी देतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता आप्पासाहेब पवार सभागृहात मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार उपस्थित असणार आहेत. परंतु या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मात्र उपस्थित राहणार नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.


कृषकमध्ये शेतकरी, तरुण आणि नवउद्योजकांसाठी काय खास?


170 एकरवर या कृषिकचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी 19 ते 22 जानेवारी दरम्यान प्रदर्शन खुले राहणार आहे. 3 ते 18 जानेवारी यादरम्यान स्टार्टअप किंवा इतर इनोव्हेटरसाठी वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे. कृषिक प्रदर्शनात मायक्रोसॉफ्टमार्फत बारामती इथे उभारल्या जाणाऱ्या 'सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज्' या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि नवउद्योजकांसाठी दाखवण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयओटी, प्रिसिसीअन अॅग्रीकल्चरल, व्हर्टिकल फार्मिंग, ग्रामीण शेतकरी, रोबोटचा कृषी क्षेत्रात वापर, दुग्ध आणि फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, क्लायमेट स्मार्ट अॅग्रीकल्चर प्रॅक्टिसेस, दूध आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन असं अनेक उपक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे.


अजित पवारांविरोधात राज्यभरात आंदोलन


दरम्यान या उद्घाटन कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, यांच्यासह कृषी क्षेत्रांशी निगडित नामांकित कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचं अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितलं होतं. परंतु आता अजित पवार हे या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात सत्ताधारी भाजपसह विविध संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संभाजी महाराज हे धर्मवीर (Dharmaveer) नव्हते ते स्वराज्य रक्षक (Swarajya Rakshak) होते, असं अजित पवार विधानसभेतील भाषणात म्हणाले होते. अजित पवार यांच्या या वक्तव्याचा भाजपकडून राज्यभर निषेध केला जात आहे. तसंच भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  


संबंधित बातमी


Ajit Pawar : अजित पवारांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली, बारामतीतच दादांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, भाजप आक्रमक