पुणे: पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी (Pune Police) मोठ्या कारवाईचा बडगा उगारला आहे, पहिल्यांदा आंदेकर गँगचा म्होरक्या बंडू आंदेकर नंतर घायवळ गँगचा म्होरक्या निलेश घायवळ त्यानंतर आता टिपू पठाण (Tipu Pathan) टोळीतील गुन्हेगारांची बँक खाती गोठवली आहे. हडपसर परिसरात बनावट कागदपत्रांद्वारे बेकायदेशीर बांधकाम करून नागरिकांकडून लाखो रुपयांचा मोबदला वसूल करणाऱ्या रिझवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (Tipu Pathan) आणि त्याच्या टोळीतील साथीदारांवर काळेपडळ पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी आरोपींची बॅंक खाती गोठवली असून, अनधिकृत बांधकामे तोडण्याची कारवाईही सुरू केली आहे. (Pune Police)

Continues below advertisement

Tipu Pathan: लाखोंच्या सामानाची कागदपत्रे नव्हती

काळेपडळ पोलिस ठाण्यात (Pune Police) दाखल गुन्ह्यातील आरोपी टिपू पठाण (Tipu Pathan) (रा. सय्यदनगर, हडपसर) याच्या नावावरील मोटार पोलिसांनी जप्त केली आहे. पठाण आणि त्याचे साथीदार सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब शेख, जावेद शेख, मुनीर शेख आदींची बँक खाती गोठविण्यात आली असून, संशयित आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. आरोपींच्या घरांची झडती घेताना पोलिसांना पंखे, एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, फर्निचर आदी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू आढळल्या. या वस्तूंची बिले मागवण्यात आली असता आरोपींच्या नातेवाइकांकडे त्याची कागदपत्रे नव्हती. झडतीदरम्यान दोन नोटरीकृत साठेखत सापडले आहेत. गुंड पठाण (Tipu Pathan) याच्यासह साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह (Tipu Pathan) साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Police)

Tipu Pathan: चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

मिळालेल्या माहितीनुसार, टिपू पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाणचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी (Pune Police) पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, टिव्ही, वॉशिंग मशिन, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पठाण आणि साथीदारांच्या नातेवाईकांनी महागड्या गृहोपयोगी वस्तू खरेदीची बिले सादर केली नाहीत. पोलिसांनी पठाण याच्या घरातून दोन साठेखत जप्त केले आहेत.

Continues below advertisement