पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. पर्यटन स्थळावर देखील नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातही मोठ्या संख्येने पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे या ठिकाणी देखील पर्यटनासाठी प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत पुण्यातील विविध तालुक्यांतील पर्यटन स्थळांवर नागरिकांना प्रवेशासाठी बंदी घालण्यात आली आहे.


पुण्यातील प्रतिबंधित पर्यटनस्थळे-


मावळ तालुका - भुशी डॅम, घुबड तलाव, लोणावळा डॅम, तुंगाली डॅम, राजमाची पॉइंट, मंकी पॉइंट, अमृतांजन ब्रिज, वलवण डॅम, वेहेरगाव, टायगर पॉइंट, लायन पॉइंट, शिवलिंग पॉइंट, कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, तुंग किल्ला, विसापुर किल्ला, तिकोणा किल्ला, पवना धरण परिसर इत्यादी.


मुळशी तालुका - लवासा, टेमघर धरण परिसर, मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, काळवण परिसर.


हवेली तालुका - घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर


आंबेगाव तालुका - डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ.


जुन्नर तालुका - शिवनेरी किल्ला, सावंड किल्ला, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र.


भोर तालुका - रोहडेश्वर / विचित्र गड़, रायरेश्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवघर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड.


वेल्हा तालुका - तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर.


हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha