Pune Ganeshotsav 2022: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती  मोठ्या दिमाखात पंचकेदार मंदिरात विराजमान झाले आहे. अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. त्याचबरोबर अनेक दिग्गजांनी देखील दर्शनासाठी हजेरी लावली आहे. पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणून दगडूशेठ गणपतीची ओळख आहे. प्रत्येक नेते, अभिनेते यांचं देखील दगडूशेठ गणपतीबरोबर वेगळं भावनिक नातं आहे. त्यामुळे सकाळपासून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, अभिनेते  उपेंद्र लिमये, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दर्शनासाठी हजेरी लावली. बाप्पाकडे साकडं देखील घातलं. 


दगडूशेठ गणपती उत्सवाला महाराष्ट्रात मोठं स्थान आहे मी दरवर्षी येथे येतो या गणपतीच दर्शन घेतल्यानंतर मनःशांती प्राप्त होते एक वेगळी ऊर्जा मिळते असं माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी म्हंटली पाटील यांनी आज दगडूशेठ गणपतीच दर्शन घेत गणपतीची आरती केली, अशी प्रतिक्रिया माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केली.


सगळीकडील गणेश उत्सव हा  माझ्यासाठी खास आहे पण दगडूशेठ गणपती च दर्शन घेतल्याशिवाय माझा उत्सव पूर्ण होत नाही. दरवर्षी सहकुटुंब मी दर्शनासाठी येत असतो बाप्पा कडून नवीन कामासाठी सकारात्मक ऊर्जा मिळावी यासाठी दर वर्षी साकडं घालायला  येत असतो असे प्रसिद्ध मराठी अभिनेता उपेंद्र लिमयेंनी सांगितले.


दगडूशेठ गणपतीवर माझी श्रद्धा आहे. दरवर्षी मी आवर्जून याठिकणी दर्शनाला येतो. दोन वर्ष कोरोनामुळे येऊ शकलो नाही. या ठिकाणी आल्यावर उर्जा येते. पक्ष वाढतो, सामाजिक कामाची उमेद वाढते. त्यामुळे मी दरवर्षी नवस करतो. महाराष्ट्रातील जनतेला सर्वदृष्टीने समृद्धी लाभेल. राज्य सरकारच्या वतीने आम्हाल सेवा करण्याची संधी मिळू देत असं माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर गणपतीकडे साकडं घातलं  आहे. 


प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी पत्नी सह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे दर्शन घेतले . मागची 2 वर्षे सगळ्यांची फार बिकट गेली खूप अवघड परिस्थितीत गेली यावर्षी सगळे सुरळीत झाले आहे बाप्पाचं आशीर्वाद आहे सगळ्यांचे आरोग्य चांगले राहूदे आणि आशीर्वाद राहूदे अशी त्यांनी प्रार्थना केली आहे.