Pune Crime News Update : चुलती आणि पुतण्यानं एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे शिरुर तालुक्यात खळबळ माजली आहे. शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे चुलती आणि पुतण्याने एकाच वेळी आत्महत्या केली. तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कल्पना रवींद्र शिंदे (31 वय) आणि सचिन दौलत शिंदे (वय 24) असे आत्महत्या करणाऱ्या चुलती आणि पुतण्याची नावे आहेत.
कल्पना आणि सचिन या चुलती-पुतण्याने गळफास घेत आत्महत्या केल्यानं गणेगावात खळबळ माजली आहे. गावात हळहळ व्यक्त करण्यात येतेय. याप्रकरणी दौलत ज्ञानदेव शिंदे आणि गोविंद ज्ञानदेव शिंदे यांनी शिरुर पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. त्यानंतर शिरुर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली.
चुलती - पुतण्याने 24 तासांत आत्महत्या केली -
पोलिसांनी या दुर्दैवी घटनेबाबात माहिती दिली. त्यानुसार, गणेगाव दुमला गावात संगमेश्वर वस्तीवर कल्पना शिंदे आणि सचिन शिंदे हे कुटुंबीयासोबत राहत होते. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी कुणीच नाही, हे पाहून कल्पना शिंदे यांनी घरातील लोखंडी अँगलला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. कल्पना शिंदे यांचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमला पाठवला. याबाबत पोलीस अधिक तपास घेत होते. कल्पना शिंदे यांच्या मृत्यूला 24 तास उलटले नाहीत तोच पुतणा सचिन दौलत शिंदे यानेही घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं.
याघटनेबाबत शिरुर पोलीस ठाण्यात दौलत शिंदे आणि गोविंद शिंदे यांनी माहिती दिली. दोघांच्याही आत्महत्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. याप्ररणी पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या अध्यक्षतेखाली तपास सुरु आहे.
आणखी वाचा :
नात्याला काळीमा, अश्लील व्हिडीओ पाहून बहिणीवर अत्याचार, 19 वर्षीय भावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या