Pune Crime News : पुण्यात महिला रिक्षाचालकावर (Pune) बलात्काराचा प्रयत्न (pune crime) केल्याचा संतापजनक प्रकार समोर (Rikshaw) आला आहे. प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्या एका व्यक्तीने रिक्षाचालक असलेल्या महिलेसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील कात्रज घाटात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. निखिल अशोक मेमजादे असं तीस वर्षीय अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचं आहे. 


रिक्षाचालक महिलेने आरोपीला विरोध केला असता त्याने संपूर्ण कपडे काढून नग्न अवस्थेत या महिलेचा कात्रज घाटात पाठलाग केला. कात्रज घाटात 26 डिसेंबरच्या रात्री दहा वाजता हा सगळा प्रकार घडला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 38 वर्षीय महिला रिक्षाचालकाने तक्रार दिली आहे.


नेमकं काय घडलं?


तक्रारदार महिला या रिक्षाचालक आहेत. 26 रोजी आरोपी रात्री आरोपी कात्रज घाटात जायचे आहे, असे सांगत रिक्षात बसला. कात्रज घाटातील एका लॉजिंगजवळ रिक्षा थांबवून त्याने महिला चालक यांना जेवणासाठी जबरदस्ती केली. मात्र या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिला मारहाण करत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. एवढंच नाही तर या प्रवाशाने स्व:तचे सगळे काढून तो नग्न अवस्थेत रिक्षात बसला. महिलेला हा सगळा प्रकार खटकला आणि तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निर्लज्ज पुरुषाने भर रस्त्यात नग्नावस्थेत तिचा पाठलाग केला. त्यानंतर महिलेने स्वत:चा बचाव केला. या संदर्भात महिलेने पोलिसांत धाव घेतली घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. 


रिक्षाचालक महिला असुरक्षित?


पुण्यात रिक्षाचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात अनेक महिला रिक्षाचालकांचा देखील समावेश आहे. मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी पुण्यात अनेक महिला रिक्षाचालक आहेत. शहरात अनेक परिसरात या महिला रिक्षा चालवतात. प्रत्येक प्रवाशाला हव्या त्या ठिकाणी पोहचवण्याचं चोख काम या महिला करतात. मात्र याच रिक्षाचालकाबरोबर असा किळसवाणा प्रकार घडल्यामुळे सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. रिक्षाचालकावर कात्रजच्या निर्मनुष्य परिसरात बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा पहिलीच घटना आहे. मात्र यावरुन महिला रिक्षाचालकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.