Ashok Saraf : पुण्यात 'अशोक पर्व' कार्यक्रमाचं आयोजन आलं आहे. या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी पुण्यातील सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले. तसेच, राज साहेब ठाकरे यांच्या हस्ते माझा सत्कार झाला हे मी माझं भाग्यच समजतो असंही ते यावेळी म्हणाले. 

  


अशोक सराफ पुढे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे हा माझा अतिशय आवडता माणूस आहे. ते एक ब्रिलियंट व्यक्ती आहेत. तसेच, कोणत्याही मुद्द्यावर बोलताना संपूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय ते कधीच काहीच बोलत नाहीत त्यामुळे असा अभ्यास करणारी लोकं फार कमी आहेत. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून मला ते भावतात असं अशोक सराफ कार्यक्रमाच्या वेळी बोलताना म्हणाले. 


राज ठाकरे यांचं कौतुक करताना पुढे अशोक सराफ म्हणाले की, तुम्ही कोणताही मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट घ्या राज ठाकरे यांना त्या चित्रपटाबद्दल सगळं माहित असतं. यावेळी राज ठाकरे यांनी डोक्याला गंमतीने हात मारून घेतला. कलाकारांसाठी झटणारा नेता म्हणून राज ठाकरे यांच्याकडे मी नेहमीच आदराने बघतो. असेही अशोकमामा यावेळी म्हणाले. 


प्रेक्षकांवरील प्रेम पाहून अशोकमामा भारावले


आतापर्यंत सर्वात जास्त कॉमेडी चित्रपट म्हणून सासू वरचढ जावई सिनेमा आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तसेच, मी ज्या चित्रपटांत काम करतो लोकांना त्यातल्या भूमिका मनापासून आवडल्या. लोकांना माझं काम आवडते. हे बघून मी अतिशय त्यांचा ऋणी आहे. प्रेक्षकाचं हे प्रेम मी कधीच विसरणार नाही. हा सत्कार माझ्या नेहमीच स्मरणात राहील. आतापर्यंत लोकांनी मला सपोर्ट केल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. असं अशोक सराफ यावेळी म्हणाले. 


राज ठाकरे म्हणाले...


यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ''ज्या व्यक्तीला आपण लहानपणापासून पाहत आलो त्यांना आपण आवडतो हे सांगणे आनंद देणारे आहे. मोठ्या माणसांचे सत्कार करायला मोठी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आमच्यासारख्यावर आटोपयला लागतं. हाच कार्यक्रम जर युरोपात असता तर त्या देशाचे पंतप्रधान कार्यक्रमात हजर राहिले असते. असेही ते म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Raj Thackeray on Ashok Saraf: 'अशोक सराफ दक्षिणेत असते, तर ते आज मुख्यमंत्री असते': राज ठाकरे