पुणे : वारीमध्ये सहभागी होणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या परंपरेत यंदा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा धारकरी मुख्य पालखी सोहळ्यात सहभागी न होता फक्त पालखीचे दर्शन घेणार आहेत. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नंतर पालखीचे दर्शन घेण्यात येणार आहे. पालखीसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या धारकऱ्यांना पुन्हा घरी जाण्यासाठी वेळ होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आल्याचं सांगण्यात येत आहे. 

Continues below advertisement

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा मुक्काम शुक्रवारी पुण्यात आहे. या पालख्यांचे दर्शन धारकऱ्यांकडून घेण्यात येणार आहे. यंदा वारीसोबत न जाता फक्त पालख्यांचे दर्शन घेण्यात येणार आहे. पालखीचे दर्शन घेऊन धारकऱ्यांना वेळेत बस, रेल्वेने माघारी जाता यावं म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. 

वारीत तलवारी नाचवल्याने वाद

या आधी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी नंग्या तलवारी घेऊन वारीत सामील झाले होते. शांती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या वारीला त्यामुळे गालबोट लागला होता. त्यावेळी वाद झाल्याने पोलिसांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला होता. नंतर संभाजी भिडे आणि त्यांच्या धारकऱ्यांवर वारकरी संप्रदायातून टीकाही करण्यात आली होती. यंदा मात्र धारकरी वारीत सहभागी न होता फक्त पालखीचे दर्शन घेणार आहेत. 

Continues below advertisement

Sambhaji Bhide News : संभाजी भिडेंनी घेतलं तुकोबांच्या पालखीचे दर्शन

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आगमन पुण्यात झालं आहे. त्यांचा मुक्काम शुक्रवारी पुण्यातच आहे. या पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी शिवप्रतिष्ठानचे धारकरी पुण्यात आले आहेत. संचेती हॉस्पिटलजवळ संभाजी भिडेंसह धारकऱ्यांनी संत तुकारामांच्या पालखीचं दर्शन घेतलं. यावेळी वारकऱ्यांनी विठुरायाचा आणि रामनामाचा जयघोष केला. यावेळी संभाजी भिंडेंनी तुकोबांच्या पालखीचं सारथ्यही केलं. 

ही बातमी वाचा: