Ashadhi Wari 2022 : संत ज्ञानेश्‍वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत आहेत. यावेळी संत ज्ञानेश्वर महारांजाच्या पालखीचा प्रवास आज वारीतील सर्वात अवघड भाग असणाऱ्या दिवे घाटातून (Dive Ghat) होत आहे. दोन्ही पालख्या आधी हडपसर रस्त्याने पुढे दिवे घाटमार्गे सासवड येथे मुक्कामी असणार आहेत. पण तत्पूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज दिवे घाटातून खडतर प्रवास करत असताना त्याच्या वारकऱ्यांच्या (Ashadhi Wari 2022) मदतीला शेकडो तरुण-तरुणींची फौज रॉबिनहूड आर्मीच्या (Robinhood army) रुपात पोहोचली आहे. 


असं म्हटलं जातं की शेकडो किलोमीटर पायी चालल्यानंतर मजल दरमजल मुक्काम करत पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना आषाढीला विठ्ठल भेटतो. मात्र जे सेवेकरी रस्त्यात या वारकऱ्यांची सेवा करतात त्या सेवेकऱ्यांना या वारकऱ्यांमध्ये विठ्ठल भेटतो. बहुधा अशीच मानसिकता असणारे जवळपास चारशे तरुण-तरुणी असणारी रॉबिनहूड आर्मी वारकऱ्यांच्या सेवेसाठी पालखीत आली आहे. पुण्यातील ही सगळी तरुण मंडळी पहाटेपासून या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये अक्षरशः दंग असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोणी या वारकऱ्यांना लिंबू सरबत आणून देत आहे तर कुणी फराळाचे वाटप करत होते. दररोज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करणारे हे तरुण तरुणी आज अवघड दिवे घाट चालून येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला मसाज करण्याचे काम करत असल्याचं इथे पाहायला मिळालं.  


सध्या पालख्यांचा प्रवास घाटातून होत असताना याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. वाहतूक बदल लक्षात घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे. दोन्ही पालख्यांमध्ये लाखोंच्य संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवे घाटासाठी पर्यायी मार्ग दाखवण्यात आले आहे.


हे देखील वाचा-