पुणे : बॉलिवूडचे अभिनेते गोविंदांना (Govinda Ahuja) लोकसभेसाठी संधी दिली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास मांडणाऱ्या मराठी कलाकाराला का हिणवले जाते? असा सवाल शिरूर लोकसभेतील (Shirur Loksabha Constituency) मविआ उमेदवार अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) विचारला आहे. मुख्यमंत्र्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी म्हणून शिवाजी आढळरावांना कोल्हेनी यानिमित्ताने डिवचले. तसेच गोविंदाच्या खासदारकीचा लेखाजोखा एकदा पहावा, असा टोला अजित पवारांना ही कोल्हेंनी लगावला.
अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सिनेस्टार गोविंदा यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर, जी मुख्यमंत्री यांनी भूमिका मांडली याबद्दल मी त्यांचे आवर्जन आभार मानतो. याचं कारण, असं आहे की गेली काही वर्षे सातत्याने शिरूर लोकसभा मतदार संघातल्या मायबाप जनतेनं माझ्या सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील अभिनय क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीला लोकसभेत निवडून दिलं. त्यानंतर शेलक्या शब्दांमध्ये जे कायम हिणवल जात होतं, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.
'नाटक्या असेल, नोटंकी असेल, नाच्या असेल आणि खरोखर मग प्रश्न पडतो. हिंदी सिनेसृष्टीतला सिनेस्टार आला तर मग त्यांचं स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका करुन आपला जाज्वल्य इतिहास, खरा इतिहास पोहोचवणाऱ्या माझ्या सारख्याच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांचे पूर्वाश्रमीचे सहकारी आणि आत्ता ज्यांनी पक्ष बदलला ते सातत्याने अशी टीका टिप्पणी करतात त्यामुळे मी मुखमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त केली. आता मुख्यमंत्र्यांनी सगळ्या गोष्टी आपल्या सहकाऱ्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, असा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला. मला असं वाटत की, सिनेस्टार गोविंदा मागे एका टर्म मध्ये खासदार होते. तेव्हाचा त्यांचा परफॉर्मन्स बघावा. आणि मला थोडीशी पातळी सोडून नाटक्या, नाच्या अशा शब्दात जर कोणी हिणवत असेल त्यांनी 2019 ते 2024 या मधला माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स तपासून पाहावा, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यातून संस्कृती दिसते!
पहिल्याच टर्म मध्ये तब्बल तीन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शिरूर मतदार संघाचे अनेक प्रश्न हे मार्गी लावल्यानंतर, हिरहिरीने मांडल्यानंतर कोण अशा पद्धतीने टीका करत असेल तर त्यातून ज्याची त्याची संस्कृती दिसते, असंही ते म्हणाले.
इतर महत्वाची बातमी-