Shasan Aplya Dari Jejuri : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri Shashan Aplya Dari) येथे 7 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) आणि जेजुरी विकास आराखडा भूमीपूजन (jejuri) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी लाभार्थी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आणि अन्य वाहनांने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले आहेत.
वाहतुक कोंडी होऊ नये म्हणून 5 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत पुणे ते पंढरपूर आणि पुणे ते बारामती या मार्गावरील जड, अवजड आणि इतर वाहतूक बंद करुन अन्य पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
जेजुरी पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक
सातारा, फलटण, लोणंद, बारामती येथून पुणे येथे जाण्याकरीता जेजुरी सासवडकडे येणारी जड अवजड व इतर - वाहतुक पूर्णपणे बंद करुन त्यावरील वाहने ही निरा-मोरगाव-सुपा ते केडगाव चौफुला मार्गे पुणे-सोलापुर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहेत. पुण्याकडून बारामतीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करुन बेलसर- कोथळे- नाझरे सुपे-मोरगाव रस्ता मार्गे बारामती-फलटण- सातारा या मार्गे वळविण्यात येणार आहे.
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्यीतील वाहतूक: बारामती व नीरा बाजूकडून जेजुरी मार्गे पुणे बाजुकडे जाणारी जड, अवजड आणि इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन ती मोरगाव- सुपा- केडगाव चौफुला मार्गे पुणे- सोलापूर महामार्ग क्रमांक 65 वरुन पुणे या मार्गे वळविण्यात येणार आहे.
सासवड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण हद्दीतील वाहतूक
पुणे बाजूकडून जेजुरी मार्गे फलटण - सातारा बाजुकडे जाणारी जड, अवजड व इतर वाहतूक पूर्णपणे बंद करुन सासवड- नारायणपूर-कापूरहोळ मार्गे सातारा - फलटण किंवा सासवड-वीर फाटा-परींचे- वीर- वाठार मार्गे लोणंद या मार्गे वळविण्यात येत आहे.
वाहतुकीस लावलेले निर्बंध 7 ऑगस्ट रोजीच्या ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी शिथील राहतील. नागरिकांनी वाहतूकीत केलेल्या बदलाची नोंद घेवून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :