पुणे : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर (Mumbai Pune Expressway) मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवर नादुरुस्त झालेल्या रुग्णवाहिकेला आग लागून तिचा स्फोट झाला. सुदैवाने रुग्णवाहिका जेव्हा नादुरुस्त झाली त्यावेळी त्यामधून सर्व प्रवासी बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र अत्यवस्थ असलेल्या महिला रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका नादुरुस्त झाल्याचं लवकर लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रुग्णवाहिकेच्या या स्फोटात पोलीस कर्मचाऱ्यांची दुचाकी आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली आहे. 


पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मुंबईहून पुण्याला रुग्णवाहिका एका ज्येष्ठ महिलेला घेऊन निघाली होती. पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर आल्यावर अचानक ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं समजलं. नादुरुस्त असल्याने रुग्णवाहिका समोर न जाता उतारावरुन मागे येत होती. हे लक्षात आल्यावर प्रवासी रुग्णवाहिकेतून उतरले. त्यानंतर उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेचा स्फोट झाला आणि रुग्णवाहिका जळून खाक झाली. रुग्णवाहिकेमधून ज्या अत्यवस्थ रुग्ण महिललेलं घेऊन जात होती. तिचा लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने ती मृत्युमुखी पडली. रुग्णवाहिकेला लागलेली आग देवदूत व फायरब्रिगेडच्या मदतीने विझवण्यात आली आहे. रुग्णवाहिकेचे स्फोटामुळे उडालेले पार्ट रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. 


पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भर रस्त्यात बर्निंग रुग्णवाहिकेचा थरार


पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर भर रस्त्यात बर्निंग रुग्णवाहिकेचा थरार पाहायला मिळाला. स्फोट प्रचंड मोठा असल्याने रुग्णवाहिकेचे सगळे भाग उडून रस्त्यावर पसरले होते. त्यातलेच काही भाग पुलाच्या खालीदेखील पडले. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र सगळी परिस्थिती नियंत्रणात आणून मार्ग सुरु करण्यात आला. काही वेळ प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे. 


सुदैवाने बाकी प्रवासी बचावले...


नादुरुस्त असल्याचं माहित पडताच प्रवाशी थेट बाहेर निघाले आणि त्यानंतर लगेच रुग्णवाहिकेने स्फोट घेतला. प्रवाशी सगळेच सुदैवाने बचावले. त्यानंतर लगेच त्यांना रुग्णसेवा मिळाली मात्र तोपर्यंत रुग्ण असलेल्या ज्येष्ठ महिलेचा लाइफ सपोर्ट सिस्टम बंद पडल्याने जीव गेला. स्फोट झाल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी यावेळी वेळेत पोहचून आग विझवण्याचं कार्य केलं. मात्र आग मोठी असल्याने काही काळ वाहतूक थांबवावी लागली. रुग्णवाहिका संपूर्ण चक्काचूर झाली आहे. त्याचे भागदेखील विविध ठिकाणी उडाले आहेत. शिवाय ही रुग्णवाहिका रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


ST Bus: 80 पेक्षा जास्त एसटी फोडल्या, 36 आगाराची वाहतूक पूर्ण बंद, एक कोटीचे नुकसान; मराठा आंदोलनाचा भडका!