पुणे : शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. परंतु त्यांचा दौरा अचानक रद्द झाला आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी हे राजदूत 27 नोव्हेंबरला सीरम इन्स्टिट्यूटला  भेट देणार होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शनिवारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्याचं ठरल्याने शंभर देशांच्या राजदूतांचा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. बदललेल्या दौऱ्यानुसार हे राजदूत 4 डिसेंबरला सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. परंतु आता या राजदुतांचा दौरा रद्दच झाल्याचं सांगण्यात आलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात येणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागीय आयुक्त कार्यालयात त्यासाठी एक बैठकही आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या दौऱ्यात इतर काही देशांचे राजदूतही सहभागी होण्याची शक्यता होती. मात्र हा राजदुतांचा दौरा रद्दच झाल्याचं सांगण्यात आलं आहे.


लसीच्या मुद्द्यावरुन राजकारण करू नका - पंतप्रधान


कोरोना प्रतिबंधक लस कधी येईल हे आपल्या हातात नाही. लस कधी येणार हे संशोधकांच्या हाती आहे. त्यामुळं या मुद्द्यावरुन राजकारण करू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला होता. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, कोरोना लसीवर अनेक पातळीवर संशोधन सुरू आहे. काही लशी अंतिम टप्प्यात आहे. मात्र लस कधी येणार हे सांगता येत नाही. लस येईल तेव्हा येईल. पण कोरोनाबाबत सतर्क राहा, असेही त्यांनी सांगितले.


लस वितरणासंदर्भात राज्यात टास्क फोर्स स्थापन


महाराष्ट्रात लसीकरण कशारितीने करावे, लसीचे वितरण या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत दिली होती. कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असंही ते म्हणाले होते.