Joe Biden News : महाराष्ट्रातील (maharashtra) दर्जेदार आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये (white house) पाठवण्यात आले आहे. कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यामुळे भारतातून अमेरिकेत आंब्याची निर्यात यावर्षी पुन्हा सुरू झाली आहे. या आठवड्यात वॉशिंग्टन येथील आंबा विक्री प्रदर्शनात विविध प्रकारचे आंबे असलेली पेटी थेट अध्यक्ष जो बायडन यांना पाठवली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प होती.


रेनबो इंटरनॅशनल ही पुण्याची आंबा निर्यातदार कंपनी अमेरिकेत पाच प्रकारचे आंबे निर्यात करते. यामध्ये महाराष्ट्रातील केसर, हापूस, गोवा मानकूर, आंध्र प्रदेशातील हिमायत आणि बांगनपाली यांचा समावेश आहे. रेनबो इंटरनॅशनलचे संचालक ए.एस. सी भोसले यांनी सांगितले. सोमवारी हा आंबा अमेरिकेला पाठवण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं.



रेनबो इंटरनॅशनल ही बारामती येथील कंपनी असल्याने बारामतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत याबाबत आनंद व्यक्त केला. बारामतीतील जळोची येथे रेनबो इंटरनॅशनलने पाठवलेला आंबा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे. अमेरिकन राष्ट्रपतींना पाठवलेल्या आंब्यांमध्ये हापूस, केशर आणि गोव्यातील मानकूर आंब्याचा समावेश आहे, असे ट्विट सुप्रिया यांनी केले आहे.


महाराष्ट्रातील दर्जेदार आंबा समुद्र ओलांडून व्हाईट हाऊसमध्ये पोहोचला ही आनंदाची बाब आहे. यासाठी रेनबो इंटरनॅशनलचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्ह कोरोनामुळे अमेरिकेतील आंबा तज्ज्ञांची क्षमता तपासता न आल्याने गेल्या दोन वर्षांपासून आंबा निर्यात ठप्प झाली आहे. मात्र, आता आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाल्याने अमेरिकेत केशरपेक्षा हापूसला चांगली मागणी आहे, असं निर्यातदारचं मत आहे.