पिंपरी चिंचवड : आळंदीचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब गरुड आणि अपक्ष उमेदवार प्रदीप नानासाहेब गरुड या बापलेकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मतदारांना पैसे आणि सोन्याची अंगठी वाटप करताना पोलिसांनी कारवाई केली.

दोघांकडून 42 ग्रॅमच्या 42 सोन्याच्या अंगठ्या तर 2 लाख 60 हजार 930 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. रोकडीमध्ये 500 रुपयांच्या जुन्या नोटांचा समावेश आहे. आळंदी पोलिसांनी आयपीसी 171 नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करुन निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवला आहे.

तूर्तास पोलिसांनी गरुड बापलेकाला नोटीस बजावून सोडलं आहे. प्रभाग क्र 6 अ मधून प्रदीप गरुड हे निवडणूक लढवत आहेत. नानासाहेब गरुड हे अपक्ष निवडून आले होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन ते नगराध्यक्ष झाले होते.