Ajit Pawar: सध्या राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जन सन्मान यात्रा काढण्यात येत आहे. जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यातून जात असताना जुन्नर तालुक्यातील महिलेने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लग्न झाल्यापासून माझ्या बायकोने जेवढा वेळा हात ओढला नसेल तेवढा हात या महिलांनी ओढलाय असं उत्तर अजित पवारांनी (Ajit Pawar) दिलं आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


"आम्हाला उत्साह का येतो त्याच कारण म्हणजे, इतक्या महिला भगिणी येतात. त्या आम्हाला राख्या बांधतात. जमलेल्या इतक्या महिला माझा हात धरत होत्या ओढत होत्या. माझं लग्न झाल्यापासून माझ्या बायकोने माझा इतका हात ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला. पण, काय सांगायचं. बहिणीच्या नात्याने त्यांनी माझा हात ओढला त्या माझ्या बहीणी आहेत. माझ्या माय माऊली आहेत. त्यांना आज आंनद झाला आहे. राखी बांधताना मी त्यांना विचारायचो, माऊली पैसे आले का? त्यावर त्या म्हणायच्या हो दादा काल पैसे जमा झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता,. काही म्हणाल्या अजून आले नाहीत, पण येतील. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, असंही यावेळी अजित पवार (Ajit Pawa) म्हणालेत. 






मला जेव्हा फारसं ओळखलं जातं नव्हतं. तेव्हा मी लोणावळ्यामार्गे...


बऱ्याच वर्षांपूर्वी खोपोलीत रमाकांतचा वडापाव तर खंड्याळात दाजींची भजी खाल्ल्याशिवाय पुणे-मुंबई प्रवास व्हायचा नाही. मात्र काळानुरूप बदल झाले, द्रुतगती मार्ग उभारला गेला आणि या फेमस व्यावसायिकांना फटका बसला. त्यामुळं व्यवसाय करताना ठिकाण योग्य निवडा. मला जेव्हा फारसं ओळखलं जातं नव्हतं. तेव्हा मी लोणावळ्यामार्गे आलो की भुशी धरणासह विविध पॉइंटवर यायचो, तिथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचो. मात्र आता मला लोक ओळखायला लागले आणि यामध्ये खंड पडला असंही अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटलं आहे.


अजित पवारांच्या ताफ्याला भाजपने दाखवले काळे झेंडे


भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी  (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. त्यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.