पीटर हे मुळचे बेल्जियमचे. पण भारतात ते काही पाहुणे नाहीत. गेल्या 20 वर्ष ते कामानिमित्त चेन्नईमध्ये राहत आहेत. त्यांना फिरण्याची प्रचंड आवड आहे. दर उन्हयाळ्यात ते हिमालयाची सैर करतात. त्याचसोबत ते धावण्याचा सरावही करतात. पण सह्याद्रीची भेट घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. इथल्या किल्ल्यांच्या फक्ते फोटोंनीच ते इतके भारावून गेले की त्यांनी संपूर्णं हिवाळ्यात यांची सैर करायचं ठरवलं आणि 2 महिन्यांमध्ये लहानमोठ्या अशा तब्बल 200 किल्ल्यांवर भ्रमंती केली.
Peter Van Geit | बेल्जियमच्या नागरिकाकडून 200 किल्ल्यांची भ्रमंती | ABP Majha
पाठीवरची फक्त एक स्लिपींग बॅग घेऊन त्यांनी हा प्रवास सुरु केला आणि फोनमध्ये ते आठवणी टीपत गेले. पीटर हे एका दिवसामध्ये 100 किलोमिटरपर्यंतही धावू शकतात असं त्यांनी सांगतिलं. त्यामुळे गड चढणं त्यांना फार कठीण वाटलं नाही. भंडारदरा भागातील किल्ले त्यांना जास्त निसर्गरम्य वाटले. तर महाबळेश्वरच्या सौंदर्यानेही ते भारावून गेले.
महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. शिवरायांच्या वास्तव्यानं पवित्र झालेल्या किल्ल्याचं आकर्षण परदेशातही आहे. त्यामुळे मुळचे बेल्जियमचे असलेले पिटर वॅनग्या गड किल्ल्यांनी भारावून गेले आहेत. शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांना आधी फार माहिती नव्हता. पण प्रत्येक किल्ल्यानुसार त्यांना तो इतिहास उलगडत गेला. इथल्या स्थानिकांच्या मनात शिवाजी महाराजांबद्दल एखाद्या देवासारखा आदर आहे असं जाणवल्याचंही त्यांनी सांगितलं. या सगळ्या भ्रमंतीच्या दरम्यान स्थानिक लोकांच्या आदरातिथ्याचा पिटर यांनी आवर्जून उल्लेख केला. पिठलं भाकरीच्या तर ते विशेष प्रेमात पडले. फिरण्याच्या आवडीसाठी पिटर यांनी काही वर्ष आधी नोकरी सोडली.
संबंधित बातम्या :