पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 40 वर्ष एखाद्याच्या घरी येऊन ती परकी मानली जाते.. याचा विचार महिलांनी केला पाहिजे. वरिष्ठ तुम्हाला परकी म्हणत असतील तर तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. ते पुण्यातील इंदापूर येथे बोलत होते. दरम्यान, घरातले पवार आणि बाहेरचे पवार वेगळे, असं शरद पवार (Sharad pawar) म्हणाले होते. त्यानंतर या वक्तव्यावरुन अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत, या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण अजित पवार यांच्याकडून हा मुद्दा उचलून धरत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष केले जात आहे.  


मी तर डोक्यावर हात मारला - 


इतकं करूनदेखील लोकं समोरच्या बाजूनं आहेत पण इथे खटकते. मी सगळ्यांसाठी केलं. आता तिकडे आणि विधानसभला तिकडे आहे असे सांगतात.. मला विधानसभेला लोक ढिगाने मतदान करतील, आता माझा परिवार सोडून सगळे फिरत आहेत. काल तर प्रतिभा काकी प्रचाराला आल्या 90 नंतर त्यांनी कधी प्रचार केला नाही. मीतर डोक्यावर हात मारला, असे अजित पवार म्हणाले.


भावनिक होऊ नका - 


लोकसभेत तिकडे आणि विधानसभेला इकडे अशी लोकांची मानसिकता होती. म्हणून मी पत्ता खेळला आणि सुनेत्रा यांना उमेदवारी दिली. मी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोललो आहे. आता विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, राहुल कुल यंच्याशी मी मिळते जुळते घेतले आहे. काहींनी सांगायला पाहिजे होते की तुम्ही 50 वर्ष केलं आता त्यांना करू द्या.. पण आम्हाला काही करून दिले नाही.  भावनिक होत, एवढ्या वेळ एवढ्या वेळ म्हणतील अरे आम्ही किती दिवस थांबायचं? भावनिक होऊ नका, येणाऱ्या पुढीचा भाग्योदय कशात आहे हे पाहा, असे अजित पवार म्हणाले. 


मंत्री झाला तर आरोप होतील ना? 


एवढी काम करून देखील तुम्ही मला यश देणार नसाल तर मला वेदना होणार नाहीत का? एवढी कामे दुसऱ्या तालुक्यात केली असती तर मला बिनविरोध निवडून दिले असते. भावनिक न होता मला साथ द्यावी, असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केलं.  मी कामाचा माणूस आहे. विरोधक काहीही बोलायला लागले आहेत. मी त्यांना उत्तर देत नाही. काही जण सांगता भ्रष्ट्राचाराचा आरोप नाही. अरे मंत्री झाला तर आरोप होतील ना? खासदार आणि आमदार झाला तर आरोप होतील ना? एन्रॉरॉलचे भूखंडाचे श्रीखंड कुणी खाल्ले? दाऊद शी संबंध हे आरोप झाले नाहीत का? ते कुणावर झाले? त्यात काही तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.