पुणे : मी राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी काही गोष्टी मला माहिती नसतात, सुनील तटकरेंनी काय दावा केला हे माहिती नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली. शरद पवारांसोबत Sharad pawar) असलेल्या आमदारांचा एक गट काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा सुनील तटकरे यांनी केला होता. त्यावर अजित पवारांनी ही प्रतिक्रिया दिली.
शरद पवार गटामधील आमदारांमध्ये असंतोष आहे, त्यामुळे चार ते पाच आमदार हे लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा दावा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मी जरी राष्ट्रीय अध्यक्ष असलो तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी काय म्हटलं हे माहिती नसतं. आम्हालाही काही गोष्टी या माहिती नसतात, त्यामुळे मी यावर काही बोलणार नाही.
काय म्हणाले होते सुनील तटकरे?
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना मोठा दावा केला होता. शरद पवार यांच्यासोबतचे काही आमदार हे नाराज असल्याने लोकसभा निवडणुकीनंतर ते काँग्रेसमध्ये जातील. चार ते पाच आमदार हे सातत्याने दिल्लीला जात असून सोनिया गांधींना भेटण्याच्या तयारीत आहेत.
पुणे प्रकरणात कारवाई सुरू
पुणे अपघाताच्या घटनेमध्ये आतापर्यंत झालेल्या कारवाईबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली त्यांच्यावर कारवाई झाली. ससूनमधील दोन जण दोषी आढळले, त्यांच्यावर कारवाई झाली. आम्ही कॅमेरासमोर येत नाही म्हणजे लपवाछपवी सुरू आहे असं नाही. घटना घडल्यापासून चौकशीत जे दोषी आढळतायत त्यांच्यावर कारवाई सुरु आहे. ही गंभीर घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. दोषींवर कारवाई केली जाणार
सुनील टिंगरे हे आमदार म्हणून पोलिस स्टेशनमध्ये गेले
मी कामानिमित्त पुण्याच्या पोलिस आयुक्तांना नेहमी कॉल करत असतो पण या प्रकरणी मी पोलिस आयुक्तांना एकही कॉल केलेला नाही. आमदार टिंगरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊ द्या, कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आमदार हे मतदारसंघात असतात. एखादी घटना घडली तर त्यांना तिथे जावं लागतं. आमदार टिंगरे हे लोकप्रतिनिधी म्हणून तिथे गेले. त्यांना फोन आला म्हणून ते पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. त्यांनी कुणाला पाठीशी घाला सांगितलं नाही. सुनील टिंगरे यांच्यावर जे काही आरोप होतायत हे बिनबुडाचे आहेत. ते आमदार असल्याने त्यांना अनेकजण भेटतात, आम्हालाही पत्रं येतात. जर योग्य असेल तर आम्ही कामं करतो. कायदा हातात घेण्याचं काम मी जर केलं असेल तर कारवाई होईल.
ही बातमी वाचा :