Ajit Pawar : जोपर्यंत माझे हात पाय हालतात तोपर्यंत सगळ्यांचे भले करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. जेव्हा मला वाटेल मला कोण उजवे आहे. मी आपोआप बाजूला जाईल असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Cooperative Sugar Factory) प्रचाराचा शुभारंभ झाला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे. माझ्याकडे बघून मतदान करा असे आवाहन अजित पवार यांनी केले. जर पाच वर्षे भाव नाही दिला तर नावाचा अजित पवार नाही असेही ते म्हणाले.
कारखान्याला गाडी मिळणार नाही, हॉटेलचे बिल मिळणार नाही, चहा मिळेल
आपलं पॅनेल टू पॅनल मतदान करा. माझ्याकडे बघून मतदान करा असेही अजित पवार म्हणाले. छत्रपती कारखाना हितासाठी आम्ही मागचे सोडून दिले. मी राजकारण करायचं तिथं करेल जिथं प्रपंचाचा विषय आहे तिथं राजकारण करणार नाही असेही अजित पवार म्हणाले. कारखान्याला गाडी मिळणार नाही. चहा मिळेल, कारखाना सुरु असेल तर रस मिळेल, हॉटेलचे बिल मिळणार नाही असेही अजित पवार म्हणाले. आम्ही 20 जणांचे राजीनामा घेतले आहेत. कुणी वेडेवाकडे काम केलं तर त्याचा राजीनामा मंजूर करणार आहे. आजच माळेगावचा चेअरमन जाहीर करणार. माळेगावचे भले करायचं असेल तर अजित पवारच करु शकतो असेही ते म्हणाले.
मी कामाचाच माणूस, मी फॉर्म भरला तर तुमच्या का पोटात दुखतं?
छत्रपती साखर कारखा्याला पैशांची गरज होती. मी एकाला सांगितले 25 कोटी पाहिजेत. त्याने चेअरमनला सांगितले कागदपत्रे द्या. त्याला परत फोन केला आणि त्याला सांगितले अजित पवारांची पत नाही का? त्याने संध्याकाळी पैसे पाठवल्याचे अजित पवार म्हणाले. दोन जण उठवायला लागतात तरी यांना डायरेक्टर व्हायचंय. अरे थांबणार कधी? असा सवालही अजित पवारांनी केला. मी कामाचाच माणूस आहे. मी फॉर्म भरला तर तुमच्या का पोटात दुखतं? असा सवाल अजित पवारांना विरोधकांना केला. आम्ही कारखाना उभा केला तर यांना का त्रास होतोय. माझा खासगी कारखाना काढायची अजिबात तयारी नव्हती. सरकारने बंधने घातल्याचे अजित पवार म्हणाले.
मी एखाद्याला निवडून नाही द्यायचं म्हणालो तर काय करतो हे महाराष्ट्राला माहिती
आम्ही आमचे कारखाने कुणाला चालवयाला दिले नाहीत. पंपावर काम करून धीरूभाई अंबानी मोठे झालेत. मी जर सहकार मोडायला निघालो असतो तर मी संस्था मोठ्या केल्या असत्या का? असा सवालही अजित पवार यांनी केला. मी एखाद्याला निवडून नाही द्यायचं म्हणालो तर काय करतो हे सगळ्या महाराष्ट्रला माहिती आहे. पुरंदर ने आणि शिरुरने पण बघितले आहे असे अजित पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: