बारामती, पुणे : सध्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत प्रचारात दिसत असलेला एकही जण 4 जूननंतर दिसणार नाही, जर एकही जण दिसला तर माझ्या मिशा काढेन, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते. त्यावर आता पवार कुटुंबियांकडून टीका व्हायला सुरुवात झाली आहे. अजित पवारांना नक्कीच चार जूनला मिश्या काढाव्या लागणार आहेत, आम्ही राजकारणात पंतग उडवायला आलो नाहीत, असा हल्लाबोल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. आज शरद पवारांची इंदापूरात मोठी सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी रोहित पवारांनी बाईक रॅली काढली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. 


रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राचे लोक आणि बारामतीचे लोक हे विचारांवर प्रेम करतात. त्यांची विचारांवर रास्त असते. पवारांनी विचार सोडले नाहीत. त्यामुळे ज्या लोकांनी विचार बदलले. त्यांना नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांना चार जूनला नक्की मिश्या काढाव्या लागणार आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


आम्ही सगळे राजकारणात क्रिकेट खेळायला आणि पतंग उडवायला आलो नाही. आम्ही सिरीयर राजकारण करत आहोत. मागील महिन्यांपासून सगळेजण फक्त चार तास झोप घेऊन काम करतोय प्रचार करतोय. शरद पवारदेखील चार तास झोपतात. हे सगळं स्वार्थासाठी नाही तर लोकांसाठी करत आहोत. त्यामुळे अजित पवार काय म्हणतात, याने काही होत नसतं लोकांना काय वाटतं ते कोणाला पसंती देतात, यावर सगळं अवलंबून असतं, असंही रोहित पवार म्हणाले. 


सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे...कोण बाजी मारणार?


बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजितदादा गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. बारामतीची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बारामतीमध्ये आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने शरद पवार यांची राजकीय कारकीर्द  पणाला लागली आहे. अजित पवार यांच्यापाठी भाजपची अजस्त्र यंत्रणा आहे. मात्र, शरद पवार यांचा वैयक्तिक करिष्मा आणि जनसंपर्क बारामतीमध्ये वरचढ ठरू शकतो. त्यामुळे येत्या 4 जूनला काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


इतर महत्वाची बातमी-


Shrinivas Pawar: घराण्यातील राजकीय संघर्षामुळे अजित पवारांची आई बहिणीकडे राहायला गेली, अजितदादांना 4 जूनला मिशा काढाव्या लागतील: श्रीनिवास पवार


Sharad Pawar : तेच शरद पवार, तेच बारामती, पण चिन्ह अन् मैदान मात्र वेगळं असणार; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले!