शिरुर, पुणे : शिवाजीराव आढळराव पाटील (Adhalrao Patil) हे शिरुर लोकसभेची निवडणूक (Shirur Loksabha Election) जिंकायची महायुतीला खात्री नाही म्हणून अजित पवार शिरुर लोकसभा मतदार संघात तळ ठोकून बसले आहेत, अशी टीका, शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर केली आहे. अमोल कोल्हेंची आज शिरुरमध्ये मोठा रोड शो पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. त्याच बरोबर चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना संपवायचं आहे,असं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणाले होते. त्यावेळी अजित पवार का शांत बसले, असाही प्रश्न अमोल कोल्हेंनी उपस्थित केला आहे. 


शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असलेले आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. हे मी वारंवार सांगितलं आहे. आढळरावांचा पराभव निश्चित दिसत असल्याने मागील काही दिवसांपासून अजित पवार हे शिरुर लोकसभा मतदार संघात विविध ठिकाणी मॅरेथॉन सभा घेत आहेत. लोकसभेची निवडणूक (Shirur Loksabha Election) जिंकायची महायुतीला खात्री नाही म्हणून अजित पवार शिरुर लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून बसले आहेत, असंही अमोल कोल्हे म्हणाले. 


मागील 15 वर्ष शिरुरकरांनी आढळराव पाटलांना निवडून दिलं आहे. मात्र त्यांनी संसदेत स्वत:च्या कंपनीच्या भल्याचे प्रश्न विचारले आहेत. हे सगळ्या जनतेला माहित आहे. यावर विचारल्यास कोणत्याही प्रकारचं खरं उत्तर आढळराव पाटील देत नाहीत. त्यासोबतच त्यांनी शिरुरमध्ये रामलिंग महाराजांची खोटी शपथ खायची आणि दुसऱ्या दिवशी मुलाला व्हिडीओ करायला लावायचा, यातच त्यांची कबुली येते, असाही हल्लाबोल त्यांनी केला आहे. 


शिरुरची सर्वसामान्य जनता माझ्या पाठिशी उभी आहे. त्यात रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक गोळा होतात. हे सगळं पाहता मोठ्या मताधिक्यानं मी विजयी होणार , याची खात्री आहे, असा विश्वासही अमोल कोल्हेंनी व्यक्त केला आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Koyta Gang : पुण्यात कोयते हल्ले सुरुच; सलग दोन दिवस भररस्त्यात कोयते घेऊन राडे


उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा


Narendra Dhabholkar Case :तब्बल दहा वर्षांनंतर लागणार डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येचा निकाल; कुटुंबीयांना न्याय मिळेल?