Raj Thackeray: गेल्या काही दिवसात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांची भूमिका आणि त्यांच्या वक्तव्यानंतर काही ठिकाणी त्यांची कार अडवण्यात आली. त्यानंतर आता राज्याच्या राजकारणात अनेक पडसाद उमटताना दिसत आहेत. अशातच काल ठाण्यात घडलेल्या मनसे आणि शिवसेनेच्या राड्यानंतर आज राज ठाकरे (Raj Thackrey) पुण्यात आहेत, ते काही वेळात मुंबईला निघणार आहेत, त्यांच्यासोबत पुण्यातील मनसैनिक मुंबईपर्यंत जाण्याच्या तयारीत आहेत.


आज राज ठाकरे (Raj Thackrey) आज पुण्यात होते. ते पुण्यात असल्याने अनेक मनसे कार्यकर्ते दाखल त्यांच्या निवासस्थानाजवळ दाखल झाले होते. काल ठाण्यात झालेल्या राड्यानंतर मनसे कार्यकर्ते राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या निवासस्थानी एकवटले होते. मात्र, राज ठाकरे (Raj Thackrey) हॉटेलमध्येचं मुक्कामी होते, खाजगी कामासाठी राज ठाकरे आले असल्याची माहिती शहर मनसेने दिली होती. आज कोणतेही पक्षीय कार्यक्रम नाहीत. ते त्यांच्या खासगी कामासाठी आल्याची माहिती आहे. कालच्या राड्यानंतर ज मनसैनिक राज ठाकरेंसोबत सुरक्षा कवच बनून जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.


नेमकं काय घडलं?


उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackrey) काल ठाण्यातील रंगतनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यापूर्वी या सभास्थळी मनसैनिक घुसले. सभास्थळी मनसैनिकांकडून गोंधळ घालण्यात आला. पोलिसांनी मनसैनिकांची धरपकड सुरु केली. मनसेच्या वतीने उध्दव ठाकरे यांच्या ताब्यातल्या गाडीवर फुगे मारण्यात आले. त्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरे (Uddhav Theackrey) यांच्या वाहनाखाली टायर जवळ सुपारी ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यांच्या गाडीवर बांगड्या, टोमॅटो, शेण फेकण्यात आलं, यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या होत्या. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत. 


उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) कारवर शेण फेकलं, बांगड्या फेकल्या, नारळ फेकून ताफ्यातील गाड्यांच्या काचा फोडल्या, थेट उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी घुसून मनसैनिकांनी गोंधळ घातला. ठाण्यात एवढा राडा झाला असतानाही उद्धव ठाकरे असो वा संजय राऊत (Sanjay Raut), यांनी आपल्या भाषणात राज ठाकरेंचा (Raj Thackeray) कोणताही उल्लेख केला नाही. दरम्यान याचे पडसाद राज्यभरात उमटताना दिसत आहेत. तर कोल्हापुरात शिवसैनिकांनी मनसेचा फलक पाडला त्याला काळे फासले.