पुणे : राज्यातील राजकारणात पक्षांतर करणाऱ्यांचे सिने अभिनेते नाना पाटेकरांनी कान टोचलेत. पिंपरी चिंचवडमध्ये एक तोची नाना या मुलाखतीत ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार समीरन वाळवेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. मला अनेक नेते भेटतात, या पक्षात आहे का? असं विचारलं तर त्यांचा दुसऱ्या पक्षात प्रवेश झाल्याचं सांगतात, असा चिमटा पिंपरी चिंचवडमधील ज्येष्ठ नेते आझम पानसरेंशी बोलताना काढला. प्रत्येक पक्षाची विचारसरणी आणि नियमावली सुंदर असते. पण त्याची अंमलबजावणी आणि पायमल्ली कोण कसं करतो. हे महत्वाचं आहे असं सांगत मला विजया मेहता हा पक्ष मिळाला, तोच मी स्वीकारला. तसेच बॅरिस्टरमधून पुन्हा एकदा नाटकात येऊ इच्छितो असं ही नानांनी जाहीर केलं.


केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना कालच म्हणालो. निवडणुकांनंतर विरोधी पक्षातील योग्य माणसाला मंत्री पद द्या. असं म्हणत सिने अभिनेते नाना पाटेकरांनी केंद्रीय अर्थमंत्री पद हे मनमोहन सिंगांना द्या. काही बिघडणार नाही. सरतेशेवटी तुम्ही जनतेचं भलं पाहताय ना? असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न उपस्थित करताना देशातील आर्थिक स्थिती योग्य नसल्याचं नानांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं. पण या उत्तरानंतर तुम्ही मात्र राजकारणाची ऑफर स्वीकारली नाही? असा प्रतिप्रश्न आला. यावर राजकारण हा माझा पिंड नाही. मी खूप स्पष्ट बोलतो, उद्या मी पक्षात प्रवेश केला आणि पक्षप्रमुखाला तुम्ही चुकीचं बोलताय म्हणालो तर ते मला पक्षातून काढून टाकतील. मग दुसऱ्या दिवशी दुसरा पक्ष असं आठवड्यात सगळे पक्ष संपतील. शेवटी मी एकटाच राहीन. अशी कोपरखळी मारत राजकारणाची ऑफर धुडकावल्याचं नाना म्हणाले.

शरद पवार हे चाणक्य ही आहेत आणि चंद्रगुप्त ही - नाना

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे चाणक्य ही आहेत आणि चंद्रगुप्त ही. हे मला फार उशिरा समजलं. त्यामुळेच हा माणूस मला खूप आवडतो असं सिने अभिनेते नाना पाटेकर म्हणाले. अजित पवार ही मला आवडतो. चुका प्रत्येकात असतात, म्हणून काय तोच ठप्पा लाऊन बसायचं नसतं. आपण एकदा आपलं म्हटलं की मग ते आपलंच. असं म्हणत नानांनी अजित पवारांची ही स्तुती केली. शरद पवार माझे हिरो होते. मी त्यांना बोललो होतो, आपण राजकारणातले चाणक्य आहेत. असंच असायला हवं. फक्त दुर्दैव्य इतकंच की आपण एक ही चंद्रगुप्त तयार नाही केलात. पण नंतर लक्षात आलं की चाणक्य ही तेच चंद्रगुप्त तेच आहेत. असं म्हणताच सभागृहात हशा ही पिकला.

प्रत्येकाला किमतीचे लेबल आहे मात्र शेतकऱ्यांना नाही. अशी खंत व्यक्त करताना कांद्याचं वाढलेल्या दरानंतर बजेट कोसळलं म्हणणाऱ्यांचे नाना पाटेकरांनी कां टोचले. शेतकरी भिकारी नाही. मॉल मध्ये खरेदी करताना घासाघीस करत नाही पण शेतकऱ्याच्या मालाचे मात्र दर पाडून मागता. या गरिबांकडे भाऊ करू नका अशी विनवणी नानांनी केली.

Ajit Pawar | पुणे मेट्रोच्या बैठकीत अजित पवारांचे धडाकेबाज निर्णय | ABP Majha