पुणे: पुण्याच्या जवळ असलेल्या बोपदेव घाटामध्ये दोन दिवसांपुर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका 21 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. 3 ऑक्टोबर रोजी तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी महत्त्वाची माहिती दिली होती. बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत तिघांनी त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार (Pune Crime News) केल्याचा प्रकार घडला आहे. त्या तिघांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीली धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याच्याच कपडे काढून, त्याला झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले. या घटनेतील संशयित आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.


बोपदेव घाट गॅंगरेप प्रकरणात तब्बल तीस तास उलटून गेले तरी पोलिसांना अजूनही आरोपींचा कुठलाही मागमूस लागत नाही. शहर पोलिसांच्या तब्ब्ल 25 टीम वेगवेगळ्या दिशेने या आरोपींचा शोध घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल दहा किमी अंतरापर्यंत सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली आहे. बोपदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला तीन संशयिताच एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.




तरुणाला मारहाण करून झाडाला बांधलं अन्..


तरूणी आणि तिचा मित्र बोपदेव घाटात गेले असताना तिघांनी तरुणीसोबत आलेल्या तिच्या मित्राला मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत धमकावलं, त्यानंतर त्याला झाडाला बांधून ठेवलं. मुलाला तिघांनी मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी प्रकरणाची चौकशी करत तपास सुरू केला. 


पोलिसांनी काय सांगितलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा आणि मुलगी पुण्यात कॉलेजमध्ये शिकत होते. पिडित तरूणी 21 वर्षांची आहे. बोपदेव घाटात ते चक्कर मारण्यासाठी आले होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात लोक बोपदेव घाटात आले, त्यांनी दोघांना धमकावलं. मुलाला त्यांनी मारहाण केली. त्यानंतर मुलाला त्याच्या शर्ट आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. अज्ञात तिघांनी मुलीवर अत्याचार केले.


या घटनेची माहिती आपल्याला पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मिळाली. या प्रकरणात पथकं कामाला लावली आहेत. अनेक लोकांची चौकशी सुरु आहे. एकुण 3 मुलं आहेत त्यांचा शोध सुरु आहे. मुलगी बाहेर राज्यातील आहे. बोपदेव घाटात नेहमी लोक वॉकिंगला जातात. यावेळी ही घटना समोर आली, मारहाण करत मित्राला त्याठिकाणी बाधून ठेवलं होतं. मुलगी गंभीर जखमी आहे, तिच्यावरती देखील उपचार सुरु आहेत. आरोपी पुर्णपणे निष्पन्न झालेले नाहीत. पिडीत मुलगी 21 वर्षाची आहे. दोघेही कॉलेजमध्ये शिक्षण घेतं आहेत, अशी माहिती समोर आली आहे.


पोलिसांकडून स्केच प्रसिद्ध


या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले आहे. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा असे पोलीसांनी आवाहन केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन श्री विनय पाटणकर,संपर्क क्रमांक : 8691999689 पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 5 श्री.युवराज हांडे संपर्क क्रमांक : 8275200947 /9307545045 किंवा नियंत्रण कक्ष पुणे शहर 020-26122880 यावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.