Pune-Panshet Accident News: पुणे-पानशेत रस्त्यावरील गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत मोठी दुर्घटना घ़डली आहे. रिक्षा आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. व्यंकटेश्वर शाळेजवळ हा अपघात झाला असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. नारायण प्रभाकर दारवटकर असं रिक्षाचालकाचं नाव आहे. रात्रीच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. गंभीर जखमी असलेल्या रिक्षाचालकाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात मोठ्या भयंकर स्वरुपाचा होता. अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालं आहे. अपघात झाल्यानंतर शेजारी असलेल्या रहिवाशांना मोठा आवाज येताच ते मदतीसाठी आले. या अपघातात रिक्षाची सीएनजीची टाकी फुटली त्यामुळे सगळीकडे गॅस गळती सुरु होती. त्यावेळी मदती आलेले शशिकांत किवळे यांनी पोलिसांना माहिती दिली. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलालासुद्धा माहिती दिली. त्यानुसार पोलीस आणि अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांची तत्परता
रस्त्यावर गर्दी दिसल्यामुळे परिसरात गस्त घातल असलेले पोलीस घटनास्थळी थांबले. यावेळी गखमी व्यक्तीला रुग्णवाहिका मिळावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. सगळीकडे फोन करत होते. मात्र काही वेळात हवेली अग्निशमन दलाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यांच्या या प्रयत्नामुळे गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला वेळेत मदत मिळाली.
रस्त्याचं काम झाल्याने वाहने सुसाट
या मार्गाचं काम पुर्ण झाल्याने मार्गावरील वाहतूक सुसाट झाली आहे. तरुण या मार्गावर जोरात गाड्या चालवत असल्याने असे अपघात सातत्याने घडल असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या मार्गावर योग्य ठिकाणी स्पीडब्रेकर लावण्यात यावे आणि रिफ्लेक्टर बसवावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. मागील काही दिवसांत आठवेळा या ठिकाणी अपघात झाला आहे.
पुण्यात देखील अपघाताचं प्रमाण जास्त
पुणे आणि ग्रामीण परीसरात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. कुठे खड्डा तर कुठे अति सुरळीत रस्त्याने हे अपघात होत आहेत. हडपसर परिसरात ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत वडिल आणि मुलीचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर अनेकांनी रस्त्यांच्या समस्येबद्दल आणि वाईट अवस्थेबद्दल आवाज उठवला होता.