रायगड : मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोली नजीक अपघात झाला आहे. कंटेनर ट्रेलर पलटी झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतकू काही प्रमाणात ठप्प झाली आहे.
अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत. कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
खोपोलीजवळ फुडमॉल परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे. तुम्हीही मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करत असाल, तर वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना ठेवूनच प्रवास करा.
एक्स्प्रेस वेवर अपघात, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Sep 2017 03:07 PM (IST)
पलटी झालेला कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -