पुणे शहरातून शंभर ते दीडशे चाईल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. खडक पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आली असून दोघा सख्ख्या भावांना अटक करण्यात आली आहे. राजकरण पुट्टीलाल (24) आणि मनोजकुमार सरोज (19) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याची बातमी गुरुवारी एबीपी माझाने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर पिंपरी चिंचवड शहरातही बाल लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल झालेत. यातील दोन गुन्ह्यांमधील आरोपींचा चाकण, तर चिखली आणि वाकड पोलीस प्रत्येकी एका गुन्हेगाराचा शोध घेत आहेत. या चौघांनी फेसबुकवरुन अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ प्रसारित केलेत. चारही आरोपींची नावं निष्पन्न झाली असून राज्य सायबर सेलने तातडीने कारवाईचे आदेश दिलेत.
पुण्यात चाईल्ड पोर्नोग्राफी करत व्हिडीओ व्हायरल, दोघा सख्ख्या भावांना अटक
गुगलकडून केंद्र सरकारला माहिती -
गुगलने काही दिवसांपूर्वी 35 हजार चाईल्ड पोर्नोग्राफ व्हिडीओची माहिती केंद्र सरकारला कळविली होती. त्यानुसार केंद्र सरकारने संबंधित राज्यातील महासंचालकांना ही माहिती पाठवली होती. त्यानंतर महासंचालकांनी राज्यातील पोलीस आयुक्तांकडे ही माहिती पाठवली होती. पुण्यातून 100 ते 150 व्हिडीओ अपलोड झाल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार सुरुवातीला पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे व्हिडीओ ज्या मोबाईल अथवा लॅपटॉपवरून अपलोड झाले आहेत. यूएलआरवरून संबंधितांचा शोध सुरू आहे.
भारत सर्वाधिक पॉर्न पाहणारा जगातला तिसरा मोठा देश -
पॉर्न हब या संकेतस्थळानुसार अमेरिका आणि ब्रिटननंतर पॉर्न पाहणारा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना या इंटरनेटवर सहज उपलब्ध होणाऱ्या पॉर्न साईट्समुळे होत असून पॉर्न साईट्सवर बंदीची मागणी झाली. मोदी सरकारने अनेक पॉर्न साईट्सवर बंदी देखील घातली होती. मात्र, आता पुन्हा अनेक पॉर्न साईट सुरू आहेत. या साईट्सवर चाईल्ड पोर्नोग्राफी देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येत असल्याचा रिसर्च आहे.
Sexual Assault | माटुंगा रेल्वे पुलावर भरदिवसा महिला,तरुणींचा विनयभंग, सीसीटीव्ही पुरावे असतानाही गुन्हे दाखल नाही