Continues below advertisement

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना त्यांच्या पक्षाच वाईट वागणूक मिळते, त्यामुळे त्यांना आता काउंसलिंगची गरज आहे असा प्रहार ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला. सत्ता असताना भाजपने काहीच कामं केली नाहीत, ती दाखवू शकत नाही म्हणून जातीय भेद आणि धर्मभेद केला जातो अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. आदित्य ठाकरे हे पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.

राज्यात निवडणूक आयोग आहे की नाही असा प्रश्न पडतो. ड्राफ्ट वाचन सुरू केलं त्यावेळी मुंबईत 31 टक्के बोगस मतदार सापडले. सत्ताधाऱ्यांनी राजकारण प्रदूषित केलं आहे. येणाऱ्या निवडणुकीत जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देणार अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

Continues below advertisement

Aaditya Thackeray Pune PC : पुण्याचा विकास थांबला

आदित्य ठाकरे म्हणाले की, "पावसाळ्यात आधी असं पुणे पाण्यात बुडत नव्हतं. आता पुण्याचा विकास थांबला आहे. अनेक विषय वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. जागातील एकमेव उदाहरण आहे, मुळा-मुठाचे पात्र हे खोल करण्यापेक्षा कमी कमी करत चालले आहेत. वेताळ टेकडीच उदाहरण भयानक आहे. टेकडी सपाट करायचं काम सुरू आहे. नाशिकमध्ये पण अशीच परिस्थिती आहे. नाशिक दत्तक घेतो असं मुख्यमंत्री म्हणाले होते. पुण्यात तर तुमची सत्ता होती, डोक्यावर मुख्यमंत्री होते. तरीही पुण्याचे प्रश्न सुटत नाहीत."

निवडणुकीच्या आधी भाजप स्वतः केलेली कामं दाखवू शकत नाही, म्हणून ते फक्त जातीय भेद करतात. पण पुण्यात पर्यावरणाचा रस होऊ देणार नाही असं आदित्य ठाकरे म्हणाले. पुण्यावर आपलं वेगळं प्रेम आहे, आजोबांचा जन्म इथला आहे. आपले बालपण पुण्यात गेले. या शहरात ट्रॅफिक, कायदा व्यवस्था, पर्यावरण हे सगळे विषय आहे. त्यामुळे जाहीरनाम्यात सगळं स्पष्ठ होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Aaditya Thackeray News : सगळं करतात, नंतर क्लिन चिट घेतात

सातारा ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट दिली. त्याच मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, आपल्या खासदाराने केंद्रीय गृहमंत्र्यांना त्या संबंधी पत्र लिहिलं आहे. आधी सगळं करून मोकळं व्हायचं आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट घ्यायची असं सगळं सुरू आहे. फक्त एकाच पक्षावर कारवाई केली जाते, सत्ताधारी नेते असतील तर त्यांना क्लिन चिट दिले जाते.

ही बातमी वाचा: