Pune- Baramati Crime News: गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी आलेल्या इसमाला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमित शेंडगे असं अटक केलेल्या इसमाच नाव आहे. अमित शेंडगेकडून बारामती पोलिसांनी दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.


बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत औद्योगिक कंपन्या आहेत. त्याच परिसरात काही इसम हे पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून तालुका पोलिसांनी सापळा रचला. त्यावरून पोलिसांना बघताच अमित शेंडगेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.  आरोपीची झडती घेताना त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल एक रिवाल्वर आणि तीन जिवंत काडतुस सापडले. ही शस्त्र तो विनापरवाना जवळ बाळगून विक्री करणार होता. त्याआधीच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 


अमित तानाजी शेंडगे वय 20 वर्ष मूळचा उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. तो सध्या बारामती तालुक्यातील रुईमध्ये राहतो. सदर आरोपीवर बारामती तालुका पोलीस स्टेशन व बारामती शहर पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 394,379 प्रमाणे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. याआधी सदर इसमाने कुणाला पिस्टल विक्री केलं आहे? आता आणलेलं पिस्टल कुणाला विक्री करणार होता? पिस्टलची विक्री कुणाला करणार होता? कुणाकडून पिस्टल घेतलं आहे.याचा तपास बारामती तालुका पोलीस करत आहेत.



दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे
अमित शेंडगे या आरोपीकडून दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केले आहेत. गावठी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी बारामती तालुक्यात आला होता. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी अमितला जेरबंद केलं आहे. दोन गावठी बनावटीचे पिस्टल, एक रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे याची विक्री तो का करत होता? कोणत्या परिसरात करत होता या अद्याप माहिती मिळू शकलेली नाही मात्र अशा प्रकारच्या विक्रीमुळे गुन्ह्यांची शंका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही