Pune Police Suicide: पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या केली आहे. सुनील शिंदे असं 48 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती मध्ये राहायला होते काल रात्री नेहमीप्रमाणे ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले मात्र आज सकाळपासून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. मुलाने वडील आवाज देऊन सुद्धा दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला लटकून गळफास घेतल्याचे मुलाला निदर्शनास आले. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नसून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
याबाबत त्यांच्या कुटुंबियाकडे प्राथमिक चौकशी केली असता. सुनील सुनेने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुनील आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आत्महत्येचं हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणाती काल न्यायालयात तारीख होती. यात त्यांच्यामना प्रमाणे चार्च फ्रेम झाला नव्हता. या सगळ्याचं त्यांनी टेन्शन घेतलं. याच तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. त्यांच्या घरी कोणतीही सुसाईट नोट मिळाली नसून त्यांचा मोबाईल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला आहे.