Pune crime News: पुण्याच्या (pune) बावधनमध्ये एका महिला पोलिसाने (ladies police) गळफास लावत आत्महत्या (suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे  कविता कुमारी असं महिलेचं नाव होतं. बिहारमधील मुजफ्फरपूर पोलीस स्टेशनमध्ये ही पोलीस महिला कार्यरत होती.  फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस पथक पुण्यात आलं होतं. कविता कुमारी या पोलीस पथकासोबत पुण्यात आल्या होत्या.


संपुर्ण पथक चांदणी चौकाजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. याच हॉटेलमध्ये कविता यांनी गळफास घेतला. हॉटेल विवा इनमध्ये तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सब इन्स्पेक्टर ओम प्रकाश प्रसाद यांच्या सोबतच्या पथकात कविता आल्या होत्या. त्यांनीच हिंजवडी पोलिसांना आत्महत्येबाबतची माहिती दिली. मात्र अद्याप या आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट आहे.


चार दिवसांपुर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या केली होती. सुनील शिंदे असं 48 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचे नाव होते. शिंदे हे लोणी काळभोर भागात असणाऱ्या कदमवाकवस्ती मध्ये राहायला होते  काल रात्री नेहमीप्रमाणे ते त्यांच्या खोलीत झोपायला गेले मात्र आज सकाळपासून त्यांनी खोलीचा दरवाजा उघडला नव्हता. मुलाने वडील आवाज देऊन सुद्धा दरवाजा उघडत नसल्याने त्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी पंख्याला लटकून गळफास घेतल्याचे मुलाला निदर्शनास आलं होतं. तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती कुटुंबीयांनी दिली होती. त्यांच्या घरी कोणतीही सुसाईट नोट मिळाली नसून त्यांचा मोबाईल पोलीसांनी ताब्यात घेतला होता.


राज्यभरात पोलिसांच्या आत्महत्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. दोन आठवड्यात पुण्यातील दोन आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. या दोन्ही आत्महत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी देखील पोलिसांनी आत्महत्या करणे धक्कादायक मानलं जात आहे. पुण्यातच नाही तर अमरावतीत देखील 24 तासांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.