Pune Crime : पुण्यात सायबर(cyber crime) चोरांचे वेगवेगळे प्रताप वाढत असल्याचं चित्र आहे. सायबर चोरांकडून (online fraud) पुण्यातील 71 वर्षीय वृद्धाची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाईफ इन्शुरन्सच्या नावाखाली सायबर चोरांनी म्हाडामध्ये काम करणाऱ्या एका निवृत्त अधिकाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक करुन 35 लाख दिल्ली, नोएडामधील विविध 12 बँक अकाऊंटमध्ये त्यांचे पैसे जमा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ज्येष्ठ नागरिकाला दीड वर्षांपूर्वी "लाईफ इन्शुरन्स" घ्या आणि त्यावर चांगला परतावा मिळेल, असं आमिष दाखवलं. यासाठी फक्त प्री इंस्टॉलमेंट फी भरावी लागेल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर करायला सांगितले होते. या सगळ्या योजनेवर वृद्धाचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांना नेट बॅंकिंगच्या स्वरुपात दिल्ली, नोएडा या शहरातील अनेक बॅंकांमध्ये 35 लाख रुपये भरायला सांगितले. विश्वास पटल्यामुळे त्यांनी 35 लाख रुपये पाठवले. काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली होती. पोलिसांनी कुठलीही रक्कम पाठवू नका, असं सांगितलं होतं. तरीही त्या वृद्ध व्यक्तीने त्या लोकांना 2 महिन्यापूर्वी आणखी 5 लाख रुपये पाठवले. सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे. 


सायबर चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध


सायबर चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध असल्याचं सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका 64 वर्षीय महिलेला लग्नाचे स्वप्न पाहणे चांगलेच महागात पडलं होतं. या महिलेसोबत एकाने सोशल मीडियावर मैत्री केली होती. त्यानंतर लग्नाचं अमिष दाखवलं आणि वेगवेगळ्या कारणाने तिच्याकडून तब्बल 57 लाख 79 हजार रुपये उकळले होते. ही घटना डिसेंबर 2021 ते जून 2022 या कालावधीत घडली होती. सायबर पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार दिली होती. त्यावरून सहा मोबाईल धारक आणि बँकेचे खाते धारक यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. तक्रारदार या गर्भ श्रीमंत होत्या. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात त्या एकट्याच राहत होत्या. त्यांची आणि आरोपीची व्हाॅट्सअॅप द्वारे ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. त्याने इरीक ब्रॉन असे नाव सांगितले होते. तो परदेशात असल्याचेही त्याने सांगितले होते. त्यानंतर त्याने त्यांच्याशी गप्पा मारून त्यांना लग्न करण्याचे देखील आमिष दाखविले होते. त्यातून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळले होते. 


संबंधित बातमी-


Pune Sextortion : पुण्यात 10 महिन्यात 1400 लोक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; तुम्हीही अडकलात तर काय कराल?