पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत?
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 02 Nov 2016 10:20 AM (IST)
पुणे : पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पंचरंगी लढत होण्याची शक्यता आहे. काल अपक्ष उमेदवार गणेश गायकवाड यांनी अर्ज भरल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही अर्ज भरणार आहेत. आज शेवटच्या दिवशी काँग्रेसचे संजय जगताप, भाजपचे अशोक यनपुरे, मनसेचे बाबू वागसकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले हे अर्ज भरणार आहेत. त्यामुळे सध्या तरी पंचरंगी लढत होण्याची चिन्हं दिसत आहेत. मात्र अर्ज मागे घेण्याची तारीख उलटल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे.