पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांची संपत्ती जप्त केल्यानंतर त्यांना आणखी एक दणका मिळाला आहे. कुलकर्णी दाम्पत्यावर 36 हजार 875 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. डीएसकेंवर तब्बल 2 हजार 43 कोटींच्या घोटाळ्याच्या ठपका ठेवण्यात आला आहे.


डीएसके आणि हेमंती यांना 17 फेब्रुवारीला अटक झाली होती. आधी दोघंही पोलिस कोठडीमधे होते, त्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यामुळे दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.

डीएसकेंच्या भावाचा जावई केदार वांजपे, त्याची पत्नी (डीएसकेंची पुतणी) सई वांजपे आणि डीएसके कंपनीचा सीईओ धनंजय पाचपोर यांना आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. वांजपे दाम्पत्य आणि पाचपोर या तिघांनाही उद्या पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

डीएसके आणि त्यांची पत्नी हेमंती यांनी केलेल्या पैशांच्या गैरव्यवहारात या तिघांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. त्यानंतर गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. केदार वांजपे हा डीएसकेंच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक होता. ड्रीम सिटीचं अधिग्रहण करण्यात त्याने महत्वाची भूमिका बजावली होती.



डीएसके आणि हेमंती कुलकर्णींचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

डीएसकेंसोबत बिनसल्यानंतर केदार वांजपे स्वतंत्रपणे व्यवसाय करु लागला. डीएसके आणि वांजपे यांनी एकमेकांवर जाहीर आरोपही केले होते. मात्र डीएसकेंसोबत असताना केदार, सई आणि पाचपोर हे डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्यासोबत बँकांकडून कर्जरुपाने मिळालेल्या पैशाचा अपहार करण्यात सहभागी होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

डीएसकेंना नोव्हेंबरमध्ये अंतरिम संरक्षण देताना गुंतवणूकदारांचे 50 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. मात्र, ही रक्कम जमा करण्यात डीएसकेंना वारंवार अपयश आलं. त्यामुळे मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण काढून घेतलं. त्यानंतर डीएस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांना दिल्लीतील डीएमआर सिएट या हॉटेलमधून अटक करण्यात आली होती.

एसीत वावरणारे 'हे' सेलिब्रेटी आता जेलमध्ये घामांच्या धारांत

डीएसकेंची मालमत्ता

फुरसुंगी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील डी एस कुलकर्णी डेव्हलपर्स लि. कंपनीच्या नावावर असलेल्या 95 मालमत्ता

शिरीष दीपक कुलकर्णी नावावरील फुरसुंगी येथील 12, मालेगाव येथील 4,  मिरज 1, रत्नागिरी 4,  नवाली तालुका पुरंदर येथील 2

दीपक सखाराम कुलकर्णी नावावारील पेरणे तालुका हवेली 3,  बाणेर येथील 2 फ्लॅट

डी एस कुलकर्णी अँण्ड कंपनी (वैजयंती मुगदल) या नावावरील नाकीर्दा तालुका महाबळेश्वर येथील एक मालमत्ता

अशा एकूण 124 मालमत्तांसह कुटुंबीतील विविध व्यक्तींच्या नावावर असलेली विविध बँकातील 276 खातीही गोठवण्यात येणार आहेत.

आलिशान कारही जप्त होणार

रॉयल एनफिल्ड यासह विविध दुचाकी आणि बीएमडब्ल्यू झेड-4, टोयोटा लँण्ड क्रुजर, फॉर्च्युनर, पोर्शे, बीएमडब्ल्यू 650 सीवॅट, बीएमडब्ल्यू 740 एलआय, ईटीऑस लिवा, एमव्ही ऑगस्था एफ 4 आरआर, ऑडी क्यू-5, अशा 40 चारचाकी जप्त

संबंधित बातम्या

बँकेकडून डीएसकेंच्या पुण्यातील राहत्या बंगल्याचा 8 मार्चला लिलाव

डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल

डीएसके पुन्हा ससूनमध्ये, चाचण्या सामान्य आढळल्यास कोठडीत रवानगी होणार

डीएसकेंच्या पोलीस कोठडीचे न्यायालयीन कोठडीमध्ये रुपांतर

डीएसकेंची 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी

डी. एस. कुलकर्णींना दिल्लीत अटक

डीएसकेंनी फसवलं, अटकेपासून संरक्षण नाही : हायकोर्ट

डीएसकेंचा बनाव उघड, जामीन अर्जावर तातडीची सुनावणी

डीएसकेंना तूर्तास दिलासा, बुलडाणा अर्बन बँक मदतीला धावली!

डीएसकेंकडून 12 कोटींच्या संपत्तीची कागदपत्रे लिलावासाठी कोर्टात सादर

"डीएसके, पैसे उसने घ्या किंवा भीक मागा, पण रिकामे येऊ नका

कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी

कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी

राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!

बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात

डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला

शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट