बारामती : बारामती शहरात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. 17 वर्षीय मुलीने रिवॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली आहे.


बारामती शहरातील सूर्यनगरी भागातील ही घटना असून, सायली उर्फ संध्या मानसिंग बळी असे या 17 वर्षीय मुलीचं नाव आहे.

सायली गेल्यावर्षी शिक्षणासाठी बारामतीत आली होती. काल (15 एप्रिल) रात्री सायलीने गावठी रिवॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज उघडकीस आली.

सायलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.