पुणे : यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) ध्वजारोहणावरुन राजकारण सुरु आहे. पुण्यातील ध्वजारोहण राज्यपाल रमेश बैस (Ramesh bais) यांच्या हस्ते होणार आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदावर अजित पवारांचा डोळा आहे. त्यामुळे पुण्यात कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सरकारने ध्वजारोहणाची यादी जाहीर केली आणि त्यानंतर ध्वजारोहणाचा तिढा सुटला होता. मात्र याच यादीवर हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि अजित पवारांनी नाराज व्यक्त केली होती. त्यानंतर आता पुण्यात रमेश बैस ध्वजारोहण करतील, असं सांगण्यात आलं आहे.
सध्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहे. त्यांना पुण्याच्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र अजित पवारांची नाराजी ओढवून घेणं परवडणारं नाही ही बाब भाजप आणि शिवसेनेला लक्षात आलं असावं. त्यामुळे एक यादी पुन्हा प्रसिद्ध करण्यात आली त्यात चंद्रकांत पाटील यांना पुण्यात नाही तर रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान देण्य़ात आला. त्यामुळे पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाची संधी मिळावी अशी मंत्री छगन भुजबळांना इच्छा होती. हसन मुश्रीफ कोल्हापूर आणि अजित पवार पुणे जिल्ह्यात ध्वजारोहण करतील, अशी मागणी होती. मात्र ऐनवेळी आलेल्या यादीत वेगळे जिल्हे देण्यात आले होते. त्यावरुन अजित पवार किंवा बाकी नेते नाराज असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार कोल्हापूरला ध्वजारोहणासाठी जाणार की मुंबईतच ध्वजारोहण करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहण
पुण्यात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7: 30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. तर राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9:05मि. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.
कोणते मंत्री कोणत्या जिल्ह्यात करणार ध्वजारोहण?
देवेंद्र फडणवीस – नागपूरअजित पवार – कोल्हापूरछगन भुजबळ – अमरावतीसुधीर मुनगंटीवार – चंद्रपूरचंद्रकांत पाटील – पुणेदिलीप वळसे पाटील – वाशिमराधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगरगिरीश महाजन – नाशिकदादा भुसे – धुळेगुलाबराव पाटील – जळगावरविंद्र चव्हाण – ठाणेहसन मुश्रीफ – सोलापूरदीपक केसरकर – सिंधुदुर्गउदय सामंत – रत्नागिरीअतुल सावे – परभणीसंदीपान भुमरे – औरंगाबादसुरेश खाडे – सांगलीविजयकुमार गावित – नंदुरबारतानाजी सावंत – उस्मानाबादशंभूराज देसाई – साताराअब्दुल सत्तार – जालनासंजय राठोड – यवतमाळधनंजय मुंडे – बीडधर्मराव आत्राम – गडचिरोलीमंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगरसंजय बनसोडे – लातूरअनिल पाटील – बुलढाणाआदिती तटकरे - पालघर इतर महत्वाच्या बातम्या
Independence Day 2023 Special : हर घर तिरंगा रॅलीचं दिल्लीत आयोजन!