पुणे : पुण्यातील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. चांदणी चौकातील (Chandani Chawk Flyover) नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज करण्यात येणार आहे. आज सकाळी 10  वाजता ते चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करतील. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असणार आहे. 


या पुलाचा फायदा काय होणार?


-या परिसरातील मुख्य रस्त्यावर कोंडी होते. त्यामुळे परिसरातील मुख्य रस्त्यांवर नागरिकांना प्रवास करावा लागणार नाही.
-मुख्य रस्त्यावर केवळ मुंबईला जाणाऱ्या किंवा येणाऱ्या वाहनांचा समावेश असेल.
-मुख्य रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होईल.
-दिवसाला दीड लाख वाहनं सहज धावू शकतील अशी या रस्त्याची रचना करण्यात आली आहे. 
-50 वर्षांच्या वाहतूक कोंडीचा विचार करुन हा पूल बांधण्यात आला आहे. 


कसा आहे चांदणी चौकातील पूल?


उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल 397 कोटी रुपयांचा आहे. मुख्य महामार्गासह कोथरूड ते मुळशी, सातारा ते मुळशी, मुळशी ते पुणे, मुळशी ते मुंबई, मुळशी ते पाषाण-बावधन, पाषाण ते मुंबई या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल व भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहतूक कोंडी टाळावी म्हणून येथे दोन सेवा रस्ते, आठ रॅम्प, दोन भुयारी मार्ग यासह17 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले.


 1  ऑक्टोबरला स्फोट करुन जुना पूल पाडला होता...


चांदणी चौकातील पुलाचं काम सुरु होऊन अनेक महिने झाले आहेत.  चांदणी चोकातील वाहतूकीला अडथळा निर्माम होणारा पुल 1  ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. त्यानंतरही अनेकदा वाहतूक कोंडी जैसे थेच होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर या पुलामुळे वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात व्हायची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या वाहतूक कोंडीत सापडले होते. त्यानंतर त्यांनी ही सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यांनी चांदणी चौकातील पुल पाडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार 1  ऑक्टोबरला स्फोट करुन पाडण्यात आला होता. 


पुणेकर वर्षभरापासून या पुलाचं काम पूर्ण होण्याची वाट बघत होते. वर्षभर या पुलाच्या कामामुळे पुणेकरांचा काहीसा त्रास सहन करावा लागला होता. अनेकदा वेगवेगळ्या मार्गावरची रस्ते बंद ठेवण्यात आली होती. काम लवकर पूर्ण व्हावं म्हणून रात्रंदिवस काम सुरु होतं अखेर आजपासून हा पुल सगळ्यांसाठी खुला होणार आहे. 



इतर महत्वाच्या बातम्या-


Pune Chandani Chowk : होय हे आपलं पुणेच आहे! चांदणी चौकाचे बांधकाम पूर्ण! पाहा भव्यदिव्य पुलाचे Exclusive ड्रोन फोटो...