Pune-Indapur Accident News:  इंदापूर तालुक्यातील काटी गावात ट्रक आणि बुलेटचा अपघात झाला. या अपघातात 12 वर्षीय तृप्ती कदमचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सकाळी 11 च्या दरम्यान घडली आहे. रस्ते बांधकामासाठी वाहतूक करत असणारा खडीने भरलेला ट्रकने कदम यांच्या बुलेटला मागून धडक दिली. त्यामुळे तृप्ती कदम ही ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेली आणि तिचा जागीच मृत्यू झाला आहे. 



नानासाहेब कदम हे मुलगी तृप्ती आणि मुलगा कृष्णा याला शाळेत सोडण्यासाठी रस्त्यावरून जात होते. त्यावेळी खडीने भरलेल्या ट्रकने बुलेटला मागून धडक दिली. या धडकेत चिमुकली तृप्ती ट्रकच्या चाकाखाली आली. त्यात दुर्दैवाने तिचा जीव गेला. त्यावेळी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. तप्तीचा जीव गेल्याचं कळताच नागरीक संतापले. संतप्त गावकऱ्यांनी खडी वाहतूक करणारा ट्रक पेटवून दिला आहे. अपघातात कृष्णा आणि नानासाहेब कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. आरोपी 40 वर्षीय विनोद महादेव जवरे यास इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


पुण्यात एका अपघातात चिमुकलीला चिरडले
चार दिवसांपुर्वी पुण्यातील सातववाडीमध्ये चिमुकलीला कंटेनरने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली होती. वडिलांसोबत शाळेत जात असताना हा अपघात घडला होता. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकारणावाबत नोंद करण्यात आली होती. यात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे सातववाडी परिसरात हळहळ व्यक्त केली गेली. कंन्टेनर भरधाव वेगात होता. त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे होते. नीलेश साळुंखे आणि मीनाक्षी साळुंखे अशी मृतांची नावे होती.


वडील रोजप्रमाणे  शाळेत सोडायला निघाले होते त्यावेळी अचानक एका कंटेनरने मागून सात वर्षीय मुलीला धडक देत चिरडले. मीनाक्षी साधना विद्यालयात पाचवीत शिकत होती. निलेश हे फुरसुंगीहून हडपसरकडे आपल्या मुलीच्या शाळेच्या दिशेने जात होते. सातववाडी येथे मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये नीलेश हे ट्रकच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला होता.