11th Admission 2022: अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर झाली आहे. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर रखडलेल्या अकरावी प्रवेश (11th Admission 2022 )प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. 25 जुलै पासून पहिल्या प्रवेश फेरीला सुरवात झाली तर 3 ऑगस्ट म्हणजेच आजपासून पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. एक महिन्यापेक्षा अधिक काळ रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा एकदा सीबीएसई दहावी निकालानंतर सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये 6 ऑगस्टपर्यंत आपली प्रवेश निश्चित करायचे आहेत.


दरवर्षी अनेक विद्यार्थी पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. त्यातल्या प्रतिष्ठित महविद्यालयात अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असतो. त्या सर परशूराम महाविद्यालय, बीएमसीसी महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, नेस वाडिया महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय, सिंबायोसीस महाविद्यालय, कलमाडी महाविद्यालय, जय हिंद महाविद्यालय, फर्ग्यूसन महाविद्यालय या महत्वाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा अशी विद्यार्थ्यांची ईच्छा असते. याच महाविद्यालयाचा कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागाची गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.


महत्वाच्या महाविद्यालयाची गुणवत्ता यादी



  • सर परशूराम महाविद्यालय- कला-467(93.40 टक्के), विज्ञान- 461 (92 टक्के) वाणिज्य-444 (88.8 टक्के)

  • बीएमसीसी महाविद्यालय- वाणिज्य- 475 (95 टक्के)

  • गरवारे महाविद्यालय- कला-319 (63.80 टक्के), विज्ञान- 452 (90.40 टक्के)

  • नेस वाडिया महाविद्यालय - वाणिज्य-417(83.40 टक्के)

  • वाडिया महाविद्यालय-कला-441 (88.20 टक्के) विज्ञान- 439 (87.80टक्के)

  •  मॉडर्न महाविद्यालय- कला-322 (64.40टक्के), वाणिज्य-431(86.20 टक्के), विज्ञान- 458(91.60टक्के)

  • सिंबायोसीस महाविद्यालय- कला-446 (93.29), वाणिज्य-445 (91टक्के)

  •  कलमाडी महाविद्यालय-कला- 458(91.60 टक्के), वाणिज्य-426 (85.20 टक्के)

  •  जय हिंद महाविद्यालय- वाणिज्य- 407 (81.40टक्के), विज्ञान- 462(92.40टक्के)

  • फर्ग्यूसन महाविद्यालय-482 (96.40 टक्के) विज्ञान-440 (88 टक्के)



6 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करता येईल. मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास प्रवेशाची औपचारिकता या काळात विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी आणि  आपला प्रवेश निश्चित करावा. जर विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीमध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी प्रोसीड फॉर अॅडमिशनवर क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी आणि महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा.