MPSC Exam postponed again LIVE Updates | परीक्षेसाठी वयाची मर्यादा आडवी येणार नाही, मुख्यमंत्र्यांची परीक्षार्थींना ग्वाही

रविवार, 14 मार्च 2020 रोजी होणारी एमपीएससीची राज्य सेवा परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलीय.. राज्य सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाच्या कोरोना निर्बंधविषयक शिफारशींनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, पुण्यात आज परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरत आंदोलन छेडलं..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Mar 2021 03:49 PM

पार्श्वभूमी

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या रविवारी 14 मार्च रोजी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून...More

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एमपीएसची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य : विनायक मेटे
वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एमपीएसची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे. जर परीक्षा झाल्या असत्या तर हजारो मुलांचे आरोग्य धोक्यात आले असते. एक मुलगा पॉझिटिव्ह आला तर त्यापासून अनेकांना धोका आहे. मराठा आरक्षणाची 25 मार्चला अंतिम सुनावणी आहे. त्यांनंतर दोन ते चार दिवसांत निकाल लागेल म्हणजे आता परीक्षा झाल्या असत्या तर सगळ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाला असता. पुढे परीक्षा गेल्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येईल. याकरता आम्ही विधिमंडळामध्ये आवाज उठवण्याचे काम आम्ही केले आहे. त्या मागणीला मुख्यमंत्री यांनी मान देऊन स्पर्धा परीक्षा पुढे ढकलली त्या बद्दल आभारी आहोत.