अमरावती: एकनाथ शिंदे मला सर्जरीनंतर बघायला आले होते त्यावेळी मी एकनाथ शिंदेंना विचारलं होतं की, एसटीमध्ये महिलांना 50% सूट दिली आहे त्यामुळे एसटी किती तोट्यात गेली आहे? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की या उलट झाल आहे. 50 टक्के महिलांना सूट दिल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. दिवसाला 150 कोटीच्या लॉसमध्ये असलेली एसटी आता महिन्याला 40 कोटी प्रॉफिटमध्ये आली आहे. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी एसटीच्या भाडे दरात 15 टक्क्यांनी वाढ केली. नेमकं कोणत्या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवायचा. असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एसटी भाडेवाढ बद्दल भाष्य केलं आहे.
आता पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार राहा- प्रकाश आंबेडकर
आकडेवारीनुसार बघितलं तर एकनाथ शिंदे यांनी दिलेली माहिती खरी होती. एसटी म्हणजे सर्वसामान्य लोकांचं साधन आहे. यात मुख्यमंत्र्यांनी सांगावं 15 टक्क्यांनी दरवाढ केली त्याचा खुलासा करावा. आता फॅशन झाली आहे, जो मुख्यमंत्री होतो तो मनाने निर्णय घेतो. भाडेवाढ का केली हे मुख्यमंत्री सांगायला तयार नाहीत. भाडेवाढ मुळे सर्वसामान्य लोकांना भूदंड मात्र बसतो आहे. मी सर्वसामान्यांना सांगणार तुम्ही भाजपला निवडून दिल, तेही पूर्ण बहुमताने. त्यामुळे आता आपण पेढे वाटा आणि एप्रिल महिन्यात रडायला तयार राहा अशी परिस्थिती सर्वसामान्यवर येणार आहे. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते अमरावती येथे बोलत होते.
राज्यातील शेतकरी मूर्ख आहे- प्रकाश आंबेडकर
राज्यातील शेतकरी मूर्ख आहे. मागील सरकारने देखील कर्जमाफी करतो, सात बारा कोरा करतो, असं म्हटलं होतं. शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो की त्यांनी पुन्हा सत्तेवर कोणाला बसवलं. तर ज्यांना सत्तेवर बसवलं त्यामुळे आता तुम्ही कशाला रडत आहात? शेतामध्ये जे आपण पेरतो तेच उगवतं. माफी करणारं सरकार नाही, सत्तेवर आल्यानंतर माफी करणार नाही असं म्हणत असेल तर यात नवीन काही नाही. निसर्गाच्या नियमाविरोधात वागणार असाल तर ते भोगाव लागतं शेतकऱ्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे. असे मोठं विधान ही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या