Chandrakant Patil on Lok Sabha : ''मराठी माणूस हा शिक्षण झाल्यावर नोकरीला प्राधान्य देतो. व्यवसाय करण्याचं तो धाडस करत नाही. आता आमच्या राजकारणात लोकसभा म्हटलं की, नको रे बाबा म्हणतो. का तर दिल्लीला जाऊन लोकसभेत मुद्दे कसे मांडायचे, मग आपलं कसं होणार. या प्रश्नांना तो घाबरतो. त्यामुळं विधानसभाच बरी असं म्हणत यावरच समाधानी राहतो. अगदी वेळ पडल्यास विधानसभा तिकीट देऊ नका म्हणतो. पण लोकसभेला उभं करू नका असं, म्हणून भीती व्यक्त करतो,'' असं राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले आहेत. पिंपरी येथे आयोजित 18 व्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते chandrakant patil) असं म्हणाले आहेत.

  


तर ही मानसिकता बदलायला हवी..


चंद्रकांत पाटील chandrakant patil) म्हणाले की, ''शासकीय अधिकाऱ्यांच्या आता दारातच कार्यालय काढावं का? अशी परिस्थिती आहे. कारण बदलीसाठी खूप तगादा सुरू आहे. यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी चक्र कायदा आणला. आता चक्रातून जावं लागतं. त्यामुळं आता बढती ही नको रे बाबा म्हणतात.'' ते chandrakant patil) म्हणाले, ''मराठी टक्का व्यवसाय, उद्योग, नोकरी, राजकारण अगदी विश्लेषकांमध्ये वाढत नाही. तिथं आपल्याला अमराठी अधिक दिसतात. तर ही मानसिकता बदलायला हवी, यासाठी पुढाकार घ्यायला हवा.''


193 देशात लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राचा 12वा क्रमांक: सुधीर मुनगंटीवार


या कार्यक्रमात बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले आहेत की, ''जगातील 193 देशात लोकसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्राचा 12वा क्रमांक लागतो. त्यात आपल्या बोलीभाषेचा दहावा क्रमांक लागतो. आर्थिक दृष्ट्या 36वा क्रमांक लागतो. सांस्कृतिक वारशाचा विचार केला तर आपण टॉप टेन मध्ये आहोत, असं आपण ठामपणे म्हणू शकतोय.'' ते म्हणाले की, ''पंधरा मिनिटांत मराठीचं महत्व सांगता येणार नाही. जगातल्या असंख्य भाषा संपुष्टात येतायेय. अवघ्या 200 ते 300 भाषा शिल्लक आहेत. त्याच टिकवून ठेवण्याचं आव्हान आहे. ही मोठी चिंताजनक बाब आहे.'' पुढे ते (Sudhir Mungantiwar) म्हणाले की, ''मराठी भाषा जगात सर्वश्रेष्ठ व्हावी, ती जपली जावी, ती आत्मसात व्हावी. यासाठी एक पोर्टल बनविणार आहे. या वेबसाईटवर प्रत्येकाची माहिती संकलित केली जाईल.''