Raj Thackeray on Adani Group: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील सभेत अदानी समूहाच्या 2014 नंतर देशभरात झपाट्याने पसरलेल्या साम्राज्याविषयी भाष्य केले होते. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी विस्तारत गेली आणि त्याचा फायदा देशातील सर्वच उद्योगसमूहांना कसा झाला, याची आकडेवारी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. मी अदानींचा वकील नाही. पण 2014 नंतर फक्त अदानी (Adani Group) नव्हे तर टाटा, बिर्ला, सन फार्मा, एव्हेन्यू ग्रूप, इन्फोसिस अशा सर्वच उद्योजकांचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर वाढल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भाजपवर पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत आकडेवारी मांडली. मुळात मला हे कळत नाह की, राज ठाकरे हे अदानीला बोलले तेव्हा भाजपला इतक्या मिरच्या का झोंबल्या? भाजपमध्ये बरेच वकील आहेत, पण अदानींनी या सगळ्यांनाच वकीलपत्र दिले आहे, हे सभेतून कळालं, अशी टिप्पणी संदीप देशपांडे यांनी केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशभरातली उद्योग, प्रकल्प गन पॉईंटवर फक्त अदानींना दिले जात आहेत, त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. हवाई क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने संपूर्ण देशाला कशाप्रकारे वेठीस धरले, हे आपण पाहिले आहे. मग सगळ्याच क्षेत्रात अदानींची मक्तेदारी निर्माण करुन त्यांना देशाला वेठीस धरण्याची संधी का द्यायची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व अदानी समूहाने स्वत:हून ग्रोथ करुन मिळवले असते तर काही समस्या नव्हती. त्यामुळे उलट रोजगारच निर्माण झाले असते. पण दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका टेकवून त्यांचे उद्योग ताब्यात घेण्यात आले, हे देशासाठी घातक असल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटले.
Mumbai Airport Adani: अदानींनी मुंबई विमानतळ कसा मिळवला?, निवडणुकीच्या एक दिवसआधी संदीप देशपांडेंचा धक्कादायक दावा
मुंबई विमानतळ हे जीव्हीके समूहाने उभारले आणि त्याचा विकास केला. पण जीव्हीके समूहावर अचानक ईडीच्या धाडी पडल्या. त्यानंतर जीव्हीके समूहाचा मोठा हिस्सा अदानींकडे गेला आणि मुंबई विमानतळ त्यांच्या ताब्यात आले. जीव्हीके समूहावर ईडीने टाकलेल्या धाडींचे पुढे काय झाले? काय कारवाई झाली, हे कोणाला माहिती आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. देशात किंवा महाराष्ट्रात कोणाचीही मक्तेदारी निर्माण होऊ नये, इतकेच आमचे म्हणणे आहे. मुंबई आणि महाराष्टरातील जमिनी आणि प्रकल्पांमध्ये सर्व उद्योजकांना समान संधी मिळाली पाहिजे, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले.
Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांनी सांगितलं कारण
राज ठाकरे सांगतात की, 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांच्यामुळे अदानींची नेटवर्थ वाढली. मी काही अदानींचा वकील नाही. पण एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, 2014 साली भारत हा जगातील 11व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. आता 2026 साल उजाडेपर्यंत भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. साहजिकच अर्थव्यवस्था वाढल्यानंतर देशभरात अनेक नवे उद्योजक तयार झाले. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे ज्या कंपन्या यापूर्वी भांडवली बाजारात सूचिबद्ध (लिस्टेड) होऊ शकल्या नव्हत्या, त्या सूचिबद्ध झाल्या. देशातील प्रस्थापित उद्योगसमूहांनी प्रचंड विस्तार केला. या प्रत्येकाचे उत्पन्न आणि नफा प्रचंड वाढला, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत केला होता.
2014 नंतर टाटा समूहाचे उत्पन्न 664, एचडीएफसी बँकेचे उत्पन्न 377 टक्के, अदानी समूह 686 टक्के, इन्फोसिस 280 टक्के, आदित्य बिर्ला ग्रूप 566 टक्के, भाती ग्रूप 266 टक्के, सन फार्मा 1552 टक्के, हिंदूजा ग्रूप 376 टक्के आणि एव्हेन्यू समूहाचे उत्पन्न 1166 टक्क्यांनी वाढले. सन फार्मा आणि एव्हेन्यू समूह या दोन्ही कंपन्या मुंबईच्या आहेत, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
आणखी वाचा