मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी कँपेनिंग करणारे डिझाईन बॉक्सचे प्रमुख नरेश अरोरा यांच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मिटकरींनी याबाबत पोस्ट देखील शेअर केली आहे, पोस्टमध्ये अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांचा फोटो शेअर करत म्हटलंय की, "दादांच्या विमान अपघात दुर्घटनेनंतर सध्या हे महाशय कुठ आहेत? यांच्याकडे महाराष्ट्राच दुर्लक्ष होतय का? कारण त्यांचे विचार ऐकुन आता त्यांचा शोध महाराष्ट्राने घ्यायलाच पाहिजे..#शोधमोहिम", या पोस्टनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमकं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचं म्हणण काय आहे, याबाबत तर्क वितर्क लावले जात होते, अशातच त्यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना याबाबत म्हटलं की, नरेश अरोरा हे सर्व सांभाळायचे. त्यांनीच गुलाबी जॅकेट दादांना दिले. त्यांनी दादांना पुष्पगुछ देऊन त्यांच्या खांद्यावर हात टाकला होता. सगळ्या पक्षाची स्ट्रेटजी ते ठरवत होते. आता अजित दादांच्या निधनानंतर हे फक्त एक दोन दिवस दिसले आत्ता ते कुठे आहेत? असा प्रश्न मला पडला म्हणून मी ट्वीट केलं, असंही मिटकरी (Amol Mitkari) म्हणालेत.

Continues below advertisement

Continues below advertisement

कारण ते महाराष्ट्रामध्ये आहेत की देशाबाहेर आहेत ते माहित नाही. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर ते कुठे दिसले नाही. खरंतर ह्या आमच्या दु:खात त्यांनी सोबत राहायला हवं होतं, त्यांनी काही पोस्ट किंवा त्याबद्दल काही बोलायला हवं होतं, पण ते कुठे आहेत असा प्रश्न आम्हाला पडला आहे, आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना? आत्ता मला माहित नाही, ते मी असं बोलल्यावर आमच्या नेत्यांना विचारतील की आपल्या पक्षाचा आमदार असा कसा बोलतोय? थोडे ते नाराज होतील. पण मला त्यांचा काही फोन येत नाही, मी ही कधी करत नाही असंही पुढे अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.(Amol Mitkari)

सभागृहात अजून देखील अजित पवारांच्या अपघातावर चर्चा नाही. आत्ता दोन दिवस या आठवड्याचे आहे, पुढच्या आठवड्यात सुद्धा सुट्या आहेत, मग अधिवेशन पूर्ण होईल. म्हणजे यांना चर्चा घडवून आणायची नाही. रोहित पवार तर त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत असंही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

विधानसभा निकाल लागल्यानंतर या आरोरांनी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि पुष्पगुच्छ दिले होते, तेव्हा मी म्हटलं होतं, सोल्जर नाही, तुम्ही सॅलरी सोल्जर आहात, आता हे कुठे आहेत. व्हीएसआर बद्दल का काही बोलत नाहीत? जो रिपोर्ट आला त्याच्यावर काही कन्टेन्ट देण्याची जबाबदारी त्यांची होती. पण ते कुठे आहेत. बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो असं म्हणत नरेश आरोरा कुठं आहेत, असा सवाल मिटकरींनी उपस्थित केला आहे.