Wardha MD Drug Case: वर्धा जिल्ह्यातील कारंजा या छोट्या गावात तब्बल 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त झाल्याच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दिल्लीहून आलेल्या डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्स (DRI) च्या पथकाने ही कारवाई केली असून, स्थानिक पोलिस यंत्रणेला याची कोणतीही कल्पना नसल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया समोर आहेत. या प्रकरणावर स्थानिक भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या जिल्ह्यात घडलेल्या या घटनेकडे दुर्लक्ष करणेही योग्य नसल्याचं ते म्हणाले.

Continues below advertisement

महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे

आमदार सुमित वानखेडे म्हणाले की, “वर्धा जिल्ह्यातील कारंजा सारख्या छोट्या गावात 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स मिळणे अत्यंत चिंतेची आणि महाराष्ट्र पोलिसांसाठी अत्यंत शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया स्थानिक भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी दिली आहे.. दिल्लीतून डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजन्सची पथक येऊन कारंजामध्ये 192 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करते आणि वर्धा पोलिसांना, स्थानिक पोलिस स्टेशनला तसेच क्राईम ब्रँचला त्याची माहितीही नसते ही लाजिरवाणी बाब असल्याचे वानखेडे म्हणाले.. वर्धा गांधींचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ मिळणे योग्य नाही.. असेही ते म्हणाले.

गृहराज्यमंत्रीपदाच्या क्षमतेवरही प्रश्नचिन्ह

ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री निश्चितच पोलिसांच्या या दुर्लक्षाला गांभीर्याने घेऊन कठोर कारवाई करतील अशी अपेक्षाही वानखेडे यांनी व्यक्त केली.. वर्धा गृहराज्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही पोलिसांचा असा दुर्लक्ष होणे योग्य नाही असं सांगून वानखेडे यांनी एका प्रकारे पंकज भोयर यांच्या गृहराज्यमंत्री म्हणून क्षमतेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.. कारंजा मध्ये मोठ्या प्रमाणावर एमडी ट्रकची निर्मिती करून नागपूरसह आजूबाजूच्या मोठ्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा करण्याचा ड्रग तस्करांचा डाव होता अशी शंकाही वानखेडे यांनी व्यक्त केली.

Continues below advertisement

वर्धा हे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जिल्हा असल्याने, या प्रकरणातील पोलिसांच्या निष्क्रियतेवर वानखेडे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला. कारंजा परिसरात एमडी ड्रग्स तयार करण्याचा मोठा रॅकेट सक्रिय होता. येथे तयार होणारे अमली पदार्थ नागपूरसह विदर्भातील प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुरवले जात होते, अशी माहिती तपासातून पुढे येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.या संपूर्ण घडामोडीनंतर वर्धा जिल्हा पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. दरम्यान, DRIच्या पथकाने जप्त केलेल्या अमली पदार्थांचा सविस्तर तपास सुरू आहे आणि ड्रग्ज तस्करांच्या संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) परिसरात गुप्तपणे सुरू असलेला मेफेड्रोन तयार करण्याचा कारखाना महसूल गुप्तचर संचालनालयाने ‘ऑपरेशन हिंटरलँड ब्रू’ अंतर्गत उद्ध्वस्त केला. विशेष पथकाने छापा टाकताना तब्बल 192 कोटी रुपयांचे 128 किलो मेफेड्रोन हस्तगत केले. या धडक कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, बेकायदेशीर ड्रग्ज निर्मितीसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या भट्ट्या, मोठी भांडी, केमिकल्स आणि विविध उपकरणेही जप्त करण्यात आली. परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज तयार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते.